हरियाणाचे भाजप सरकार अडचणीत (फोटो -सोशल मीडिया)
हरियाणा राज्यात भाजप सरकार अडचणीत आल्याची शक्यता
मुख्यमंत्री अन् मंत्र्यांमधला वाद चव्हाट्यावर
राजकीय क्षेत्रात उडाली खळबळ
हरियाणा: हरियाणा राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. हरियाणा सरकार डगमगले असल्याचे म्हटले जात आहे. हरियाणामधील भाजप सरकार अडचणीत असल्याची चर्चा सुरू आहे. सरकारमध्ये बंडखोरीचे वारे वाहत असलत्याचे म्हटले जात आहे. सरकारमधील कॅबिनेट मंत्री अनिल वीज यांनी कामगार विभागात झालेला घोटाला उघडकीस आणून स्वतःच्याच सरकारला अडचणीत आणले असल्याचे सांगितले जात आहे. कॅबिनेट मंत्री वीज यांनी मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याकडे स्वतंत्र यंत्रणेकडून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
हे संपूर्ण प्रकरण कामगार विभागाशी सबंधित आहे. हरियाणा भवन, अन्य बांधकाम कामगार कल्याण मंडळद्वारे अपात्र व्यक्तींना सरकारी योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला आहे. हा घोटाळा 1500 कोटींचा असून यामुळे सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले आहे. वीज यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
हरियाणामधील 13 जिल्ह्यांमध्ये 6 लाख वर्क स्लिप्स तपासल्या गेल्या आहेत. यातील 5,460000 चुकीच्या असल्याचे समोर आले. ऑगस्ट 2023 मध्ये कर्नाल, गुरुग्राम, रोहतक या जिल्ह्यात हा घोटाळा मोठ्या प्रमाणात झाला होता. सरकारी योजनांचा गैरफायदा घेणे हे यामागचा हेतु असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान अरता कॅबिनेट मंत्र्यानेच हा घोटाळा समोर आणल्याने मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांच्यात यामुळे काही वाद निर्माण झाला आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे सरकारला धोका निर्माण होऊ शकतो असे म्हटले जात आहे.






