बरेली : उत्तर प्रदेशमधुन (Uttar Pradesh) एक मोठी बातमी समोर येत आहे. बरेली येथील न्यायालयाने हत्या प्रकरणात एका नऊ वर्षांच्या मुलीच्या साक्ष वरुन वडील आणि अन्य दोन साथीदारांना जन्मठेपेची (life imprisonment) शिक्षा सुनावली आहे. 2021 चं हे प्रकरण असून डॉक्टर पित्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने पत्नीची हत्या केली होती. या संपूर्ण प्रकरणात 9 वर्षीय मुलीने दिलेल्या साक्षीची मोठी भुमिका आहे.
[read_also content=”लॉरेन्स बिश्नोईने दाऊद इब्राहिमशी केली हातमिळवणी! अंडरवर्ल्डचा ‘गँगस्टर प्लान’ काही नव्या संकटाना निमंत्रण तर नाही? https://www.navarashtra.com/world/lawrence-bishnoine-dawood-come-decided-to-work-together-what-will-the-underworlds-gangster-plan-nrps-397175.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर 2021 उत्तरप्रदेश येथील मिरगंज पोलिस स्टेशन परिसरात निशा नावाच्या महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मृताच्या आईच्या वतीने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान, तिच्या पतीच नाव समोर आलं होतं. या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू होता. बरेली न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणी शिक्षा सुनावत 9 वर्षीय मुलीच्या साक्षीवरून तिच्या वडिलांसह अन्य दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.मुलीने न्यायालयात सांगितले की, वडील आणि दोन पुरुष यांनी मिळून तिच्या आईचा गळा दाबून खून केला.
या प्रकरणातील आरोपी पती इक्बाल अहमदने 2012 मध्ये निशा देवीशी लग्न केले. लग्नानंतर या जोडप्याला दोन मुली झाल्या. मृतक निशा आणि इक्बाल यांचा प्रेमविवाह झाला होता. निशासमोर इक्बालने डॉक्टर राजू शर्मा अशी ओळख करून दिली. सहारनपूरमध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार हा विवाह पार पडला. यानंतर दोघेही सहारनपूरमध्ये राहू लागले. बरेलीतील मीरगंज येथे गेल्यावर निशाला तिच्या पतीची ओळख पटली. त्याला कळलं की ‘राजू’ खरं तर इक्बाल होता. त्याचे आधीच लग्न झाले होते. आरोपीने पुन्हा तिच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. पण, निशा त्याला तसे स्वीकारण्यास नकार देत होती. यावरुन दोघांमध्ये सतत वाद होत होते. नंतर डॉक्टरांनी त्याची हत्या केली.