Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

करोडो रुपये घेऊन महाराज फरार? खंडापुरातील पादुका दर्शन साेहळ्यातील वर्गणीच्या गैरप्रकाराची तक्रार

लातूर शहराजवळील खंडापूर येथे पार पडलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व पादुका दर्शन सोहळ्यात भाविकांनी अर्पण केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीचा हिशोब अद्याप न दिल्याने गंभीर गैरव्यवहाराचा आरोप समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 30, 2026 | 05:20 PM
करोडो रुपये घेऊन महाराज फरार? खंडापुरातील पादुका दर्शन साेहळ्यातील वर्गणीच्या गैरप्रकाराची तक्रार

करोडो रुपये घेऊन महाराज फरार? खंडापुरातील पादुका दर्शन साेहळ्यातील वर्गणीच्या गैरप्रकाराची तक्रार

Follow Us
Follow Us:

लातूर : लातूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लातूर शहराजवळील खंडापूर (ता. लातूर) येथे पार पडलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व पादुका दर्शन सोहळ्यात भाविकांनी अर्पण केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीचा हिशोब अद्याप न दिल्याने गंभीर गैरव्यवहाराचा आरोप समोर आला असून वारकरी संप्रदायात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाम बरुरे महाराज व इतर आयोजकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची भेट घेऊन तक्रारीत संपूर्ण आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करावा व दोषींना अटक करावी, अशी मागणी केली आहे.

 

फेब्रुवारी २२ ते २ मार्च २०२६ दरम्यान संत तुकाराम महाराज व भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पादुकांच्या आगमनानिमित्त खंडापूर शिवारात नऊ दिवसीय भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरद्वारे पादुका आणण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. लाखो भाविकांनी दर्शन घेत देणग्यांचा वर्षाव केला होता. मात्र, कार्यक्रम संपून जवळपास दोन महिने उलटूनही सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांच्या शिल्लक निधीचा हिशोब अद्याप सादर करण्यात आलेला नाही.

कोट्यवधींच्या देणगीवर प्रश्नचिन्ह; पोलिसांकडे चौकशीची मागणी

आयोजन समितीतील प्रमुख महाराज कार्यक्रमानंतर संपर्काबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. इतर संयोजकांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित महाराजांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. या प्रकरणी २८ एप्रिल २०२६ रोजी शाम बरुरे महाराज व इतर आयोजकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची भेट घेऊन तक्रारीत संपूर्ण आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करावा व दोषींना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शाम भारतराव बरुरे, ह.भ.प. निलेश महाराज चव्हाण किल्लारीकर, बाबा महाराज बोराडे, दिलीप महाराज वलसे, चंद्रकांत ज्ञानोबा आरडले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र, या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंद झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, या सप्ताहासाठी सुमारे कोट्यवधी रूपयांचा निधी जमा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, त्यापैकी काही रक्कम खर्च झाल्यानंतर उर्वरित निधी ‘भंडारा डोंगर’ येथे संत तुकाराम महाराज मंदिरासाठी देण्याचे नियोजन होते. मात्र, निधीचा हिशोबच न दिल्याने भाविकांमध्ये विश्वासघाताची भावना निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा : तरुणावर कोयत्याने सपासप वार; फुरसुंगीत ऐन गर्दीच्यावेळी खुनाचा थरार

Web Title: A complaint has been filed with the police regarding the accounting of subscriptions in khandapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • crime news
  • Latur Crime
  • Latur news

संबंधित बातम्या

शेतकरी संकटात, पंचनामे युद्धपातळीवर करा SDRF ची मदत द्या; धीरज देशमुखांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मांडल्या मागण्या
1

शेतकरी संकटात, पंचनामे युद्धपातळीवर करा SDRF ची मदत द्या; धीरज देशमुखांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मांडल्या मागण्या

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा
2

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत
3

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक
4

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.