Photo Credit- Social Media आम आदमी पक्षाने (AAP) सोमवारी (२७ जानेवारी) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.
नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना पंजाब पोलिस सुरक्षा बहाल करण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, ‘अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचला जात आहे आणि त्यांना भाजप आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून धोका आहे. अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेत पंजाब पोलिस महत्त्वाची भूमिका बजावत होते, परंतु भाजपने कट रचला आणि निवडणुकीच्या अगदी आधी ही सुरक्षा काढून टाकली. अरविंद केजरीवाल यांच्यावरील आतापर्यंतच्या सर्व हल्ल्यांमध्ये हल्लेखोर भाजप कार्यकर्ते आहेत आणि पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. असही त्यांनी स्पष्ट केलं.
“मराठा आरक्षण न मिळण्याला जरांगे पाटीलच जबाबदार…”; वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांची आक्रमक भूमिका
मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल यांच्यावरील भाजपच्या हल्ल्यांमुळे दिल्लीतील जनतेचे त्यांच्यावरील प्रेम आणि विश्वास आणखी वाढत आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची पंजाब पोलिस सुरक्षा काढून घेण्याबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री आतिशी म्हणाले, “सध्या अरविंद केजरीवाल यांना मारण्यासाठी एक मोठे षड्यंत्र रचले जात आहे. या कटात दोन प्रमुख पक्ष सहभागी आहेत.
पहिली बाब म्हणजे, भाजप कार्यकर्ते, जे दिल्लीतील विविध ठिकाणी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करतात. ते दगडफेक करतात, काठ्यांनी हल्ला करतात आणि स्पिरिट फवारण्याच्या घटना घडल्या. दुसरी बाजू म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील कट रचणारा भाजप आणि दिल्ली पोलिस.
मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या, “भाजप आणि दिल्ली पोलिसांची ही जुगलबंदी म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर एकामागून एक हल्ले होत असल्याचे आपण सतत पाहत आहोत. 24 ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांच्या नाकाखाली विकासपुरीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला झाला. सोशल मीडियावर चौकशी केली असता, हल्लेखोर भाजपचा कार्यकर्ता असल्याचे निष्पन्न झाले. तो भाजपचा कार्यकर्ता असल्याने, दिल्ली पोलिसांशी असलेले संगनमत पुन्हा एकदा समोर आले आणि पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.
आतिशी म्हणाल्या की, या घटनांवरून अरविंद केजरीवाल यांना कोणत्या गंभीर धोक्यांना तोंड द्यावे लागत आहे हे दिसून येते. या सर्व घटना घडत असताना दिल्ली पोलिस कर्मचारी तिथे उपस्थित होते हे खूप धक्कादायक आहे. ते फक्त मूक प्रेक्षक झाले होते. पण अरविंद केजरीवाल यांना वाचवण्यासाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेचा एक महत्त्वाचा आणि विश्वासू भाग असलेल्या पंजाब पोलिसांना कोणत्याही सल्लामसलतीशिवाय किंवा कारणाशिवाय अचानक काढून टाकण्यात आले आहे.