file photo
राजस्थानमध्ये भ्रष्टाचाराचे (Corruption In Rajasthan) एक मोठे प्रकरण समोर आले आहे. या महिला अधिकाऱ्याने वर्षभरात २६ फ्लॅट खरेदी केले असून या सर्वांची नोंदणी अवघ्या दोन दिवसांत झाली आहे. ज्योती भारद्वाज असं या सरकारी महिला अधिकारीचं नाव असून ती जयपूर सचिवालयात सरकारी सचिव पदावर कार्यरत आहेत.
[read_also content=”पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपत्ती किती आहे? जाणून घ्या त्यांच्याकडे काय काय आहे, पगार किती? जाणून घ्या! https://www.navarashtra.com/india/pm-narendra-modi-birthday-know-about-his-salary-networth-and-assets-nrps-458911.html”]
आजतकच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी त्यांनी खरेदी केलेल्या २६ फ्लॅटपैकी १५ फ्लॅट त्यांच्या स्वत:च्या नावावर तर ११ फ्लॅट्स त्यांचा मुलगा रोशन वशिष्ठ यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बिल्डरने सांगितले की, आपल्यासोबत फसवणूक झाली असून हे प्रकरण अद्याप न्यायालयात सुरू आहे, तर महिला अधिकाऱ्याशी संपर्क होऊ शकला नाही.
जयपूर सचिवालयात कार्यरत असलेल्या ज्योती भारद्वाज या महिला अधिकारी कार्मिक विभागात सरकारी सचिव पदावर कार्यरत आहेत. त्यांना स्टोअरमधील वस्तू खरेदीचे प्रभारी देखील बनवण्यात आले आहे. अलवरमध्ये जिल्हा कोषाध्यक्ष आणि मत्स्य विद्यापीठात वित्तीय नियंत्रक या पदावरही त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे.
कर्मचाऱ्यांना दरवर्षी त्यांच्या मालमत्तेची माहिती सरकारला द्यावी लागते. यामध्ये महिला अधिकाऱ्याने मालमत्तेच्या तपशिलात तीन घरांचा उल्लेख केला होता, त्यापैकी एक घर तिच्या पतीच्या नावावर आहे. यावर पतीचे कर्ज चालू असून, त्यांनी स्वत:च्या नावावर दोन दाखवले होते. ते घरही कर्जावर घेतल्याचे कागदपत्रांमध्ये सांगण्यात आले. दुसरीकडे, सब रजिस्टर ऑफिस, जयपूरमध्ये 4-5 मार्च 2022 रोजी 4 कोटी 71 लाख रुपये किमतीच्या 26 फ्लॅटची नोंदणी करण्यात आली होती आणि त्यासाठी 30 लाख रुपये मुद्रांक शुल्क देखील भरण्यात आले होते.
हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर ज्योती भारद्वाज संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनल्या आहेत. नोंदणीच्या वेळी, फ्लॅटचे पैसे चेकद्वारे केले गेले होते, परंतु अद्याप चेक बँकेत जमा झालेला नाही. नोंदणीनुसार, काल 5 मार्च 2022 रोजी ज्योती भारद्वाजच्या नावावर 2.74 कोटी रुपयांची नोंदणी झाली होती. त्या बदल्यात 17.8 लाख रुपये मुद्रांक शुल्क देण्यात आले.
यामध्ये फ्लॅट क्रमांक १२०५, १२०७, १२०३, १२०४, १२१४, १२१६, १००७, १०१४, १०१५, १०१६, ११०४, ११०५, १११५, १११६ आणि १११६ या क्रमांकाचा समावेश आहे. फ्लॅटची किंमत 1.97 कोटी रुपये होती आणि 12.24 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले होते. यामध्ये फ्लॅट क्रमांक 707, 714, 804, 807, 814, 816, 904, 1008, 919, 1004, 916 यांचा समावेश आहे.
या संदर्भात बिल्डरशी संपर्क साधला असता बिल्डरने आपली फसवणूक झाल्याचे सांगितले. हे प्रकरण न्यायालयातही सुरू आहे. त्याचे सर्व चेक बाऊन्स झाले आहेत. अशा स्थितीत महिला अधिकारी संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनल्या आहेत. सोशल मीडियावर त्याच्या मालमत्तेची चर्चा होत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या व्यवहारावर आणि कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणात आरोपी अधिकाऱ्याविरुद्ध आर्थिक अनियमितता आणि बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.