कोलकाता प्रकरणी निषेध आंदोलन करणाऱ्या तरुणींचा वियनभंग, आरोपी फरार
कोलकाता या ठिकाणी ९ ऑगस्टला झालेल्या लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेने सगळा देश हादरला. यानंतर पीडितेला न्याय मिळावा म्हणून आंदोलन करण्यात आलं. याचदरम्यान कोलकाता प्रकरणी निषेध आंदोलनच्या वेळी एका तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. यावेळी आरोपीने तरुणीचे प्रायव्हेट पार्ट फ्लॅश केले असल्याचा संतप्त आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान ९ ऑगस्टला सकाळी एक महिला डॉक्टर आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या ( R.G. Kar Hospital ) सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळली. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाली असल्याची बाब समोर आली. तिच्या शरीरावर आणि गुप्तांगावर अनेक जखमा होत्या. तिच्या डोळ्यांमधूनही रक्त वाहात होतं अशीही माहिती समोर आली. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या मुलीला न्याय दिला पाहिजे अशी मागणी होते आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने तिची हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आला. या प्रकरणात आरोपी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर पीडितेला न्याय मिळावा म्हणून या निषेर्धात देशभरातील डॉक्टरांकडून आंदोलन पुकरण्यात आले.
मात्र याच आंदोलनावेळी एका तरुणींचा विनयभंग झाल्याची माहिती समोर येत आहे. कोलकाता शहरातील सर्वात वर्दळीच्या चौकांपैकी एक असलेल्या एस्प्लेनेड क्रॉसिंगजवळ आंदोलनादरम्यान महिलेचा लैंगिक छळ करण्यात आला. ही घटना घडल्यानंतर, इतर आंदोलकांनी त्या व्यक्तीला रंगेहात पकडले आणि जवळपास तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र पोलिसांनी त्या व्यक्तीची ओळख स्थानिक आणि मानसिक आजारी व्यक्ती म्हणून केली आहे. त्यानंतर आंदोलक संतप्त झाल्याने पोलिसांनी त्याला जाण्याची परवानगी दिली.
आंदोलकांनी पोलिसांच्या विरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली आणि संबंधित अधिकारी आणि आरोपीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. संताप आणि निराशेने प्रेरित, आंदोलक देखील पोलिस उपायुक्त (मध्य) कार्यालयाबाहेर जमले आणि त्यांनी न्याय आणि जबाबदारीची मागणी केली.
महिलेने तक्रार दाखल केली असून भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 79 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. महिला आणि इतर आंदोलकांनी शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्व नागरिकांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांनी त्वरित आणि योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आरजी कार हॉस्पिटलमधील भीषण हत्याचार-हत्या प्रकरणाच्या विरोधात “आमरा तिलोत्तोमा” नावाच्या गटाने आयोजित केलेल्या निषेधाच्या वेळी ही घटना घडली. 9 ऑगस्ट रोजी, एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर तिच्या शिफ्ट दरम्यान क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती, ज्यामुळे या प्रकरणाची अद्याप उकल झालेली नसल्यामुळे देशभरात निषेध करण्यात आला.