आईस्क्रीमच्या बहाण्याने मुलीला घरापासून दूर अंधारात नेलं अन्…; 26 वर्षीय आरोपीचे कृत्य
अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत नातेवाईकाच्या घरी हळदीच्या समारंभात सहभागी होण्यासाठी गेली होती. तिथे उपस्थित असलेल्या निखिलने मुलीला आईस्क्रीम आणून देण्याच्या बहाण्याने तिथून नेले आणि तिच्यासोबत अश्लील कृत्य केले.
दलापूर माजी नगरसेवक हत्या प्रकरणात कोर्टाचा दणका; राऊतसह ४ जणांना जन्मठेप
Follow Us:
Follow Us:
नागपूर : आईस्क्रीम खायला नेण्याच्या बहाण्याने घरापासून दूर अंधारात नेऊन एका मुलीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणात वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपपत्र सादर केले होते. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर. पी. पांडे यांच्या न्यायालयाने आरोपी युवकाला दोषी ठरवत 5 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
निखिल प्रदीप निकोसे (वय 26, रा. वाडी) असे दोषीचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत नातेवाईकाच्या घरी हळदीच्या समारंभात सहभागी होण्यासाठी गेली होती. तिथे उपस्थित असलेल्या निखिलने मुलीला आईस्क्रीम आणून देण्याच्या बहाण्याने तिथून नेले आणि तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. मुलीने परत येऊन तिच्या आईला सांगितले, तेव्हा लगेच पोलिसांना कळवण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी पोक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. ही घटना 23 एप्रिल 2022 रोजी रात्री 9 वाजता घडली आणि 24 एप्रिल रोजी आरोपी निखिलला अटक केली. तत्कालीन महिला पोलिस उपनिरीक्षक शकुंतला गोबाडे यांनी घटनेचा तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
दोन वर्षे चालला होता खटला
दोन वर्षे चाललेल्या खटल्यानंतर न्यायालयाने निखिलला दोषी ठरवत त्यास 5 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. याशिवाय न्यायालयाने 3 रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त 3 महिने तुरुंगवास, त्याचवेळी, कलम 363 अंतर्गत दोषी ठरवल्यानंतर त्याला एक वर्ष तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
दंड न भरल्यास…
दंड न भरल्यास आणखी एक महिना तुरुंगात घालवावा लागेल. सरकारी वकील अॅड. आसावरी परसोडकर यांनी सरकारी पक्षातर्फे तर अॅड. झा यांनी बचाव पक्षातर्फे युक्तिवाद केला. पोलिस कर्मचारी अनिल पोतराजे यांनी न्यायालयाशी संबंधित काम पाहिले.
Web Title: A man molested a minor girl incident in nagpur