Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! भांडणात पत्नीने चावा घेतल्याने पती संतप्त; थेट गळाच दाबला नंतर उठवायला गेला पण…

बुधवारी पहाटेच्या सुमारास पोलिस स्टेशन येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड कर्तव्यावर असताना यांना ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथून एका महिलेच्या मृत्यूबाबत माहिती प्राप्त झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 27, 2026 | 01:26 PM
धक्कादायक ! भांडणात पत्नीने चावा घेतल्याने पती संतप्त; थेट गळाच दाबला नंतर उठवायला गेला पण...

धक्कादायक ! भांडणात पत्नीने चावा घेतल्याने पती संतप्त; थेट गळाच दाबला नंतर उठवायला गेला पण...

Follow Us
Follow Us:

चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच चंद्रपुरात एक धक्कादायक घटना घडली. शहरातील राणी लक्ष्मी वॉर्ड परिसरात कौटुंबिक संशयातून एका विवाहित महिलेचा गळा दाबून हत्या केली. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेदरम्यान झालेल्या झटापटीत पत्नीने पतीला चावा घेतल्याची बाबही समोर आली असून, अखेरीस संतापाच्या भरात पतीने तिचा गळा दाबून हत्या केली.

भाग्यलक्ष्मी ऊर्फ बन्नू राजेश मुक्या (वय ३४) असे मृतक महिलेचे नाव असून, राजेश गोपाल मुक्या (वय २४) असे आरोपी पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटेच्या सुमारास पोलिस स्टेशन येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड कर्तव्यावर असताना यांना ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथून एका महिलेच्या मृत्यूबाबत माहिती प्राप्त झाली. तत्काळ पोलिसांनी रुग्णालयात भेट देत भाग्यलक्ष्मी ऊर्फ बन्नू राजेश मुक्या हिला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची खात्री केली. प्राथमिक तपासात मृत्यू संशयास्पद वाटल्याने मर्ग नोंदवून पंचनामा व पुढील तपास सुरू करण्यात आला.

बुधवारच्या रात्री आरोपी कामावरून घरी आल्यानंतर पत्नीने त्याच्यावर परस्त्री संबंधांचा संशय घेत वाद घातला. या वादाचे रूपांतर तीव्र झटापटीत झाले. संतापाच्या भरात आरोपीने पत्नीला मारहाण करत उजव्या हाताने तिचा गळा पकडून पलंगावर दाबून ठेवले. काही मिनिटांतच तिची हालचाल बंद झाली. यानंतर आरोपीने ती झोपली आहे, असे समजून दुर्लक्ष केले. मात्र, बुधवारी पहाटे सुमारे ३ वाजता उठविण्याचा प्रयत्न केला असता ती कोणताही प्रतिसाद देत नव्हती. त्यानंतर मित्रांच्या मदतीने तिला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पत्नीने भांडणादरम्यान चावा घेतल्याचे उघड

घटनास्थळी पाहणीदरम्यान मृत महिलेचा पती राजेश गोपाल मुक्या याच्या हातावर व शरीरावर जखमा आढळल्या. याबाबत चौकशी केली असता, पत्नीशी झालेल्या भांडणादरम्यान तिने त्याच्या हातावर व अंगावर चावा घेतल्याचे त्याने कबूल केले. शवविच्छेदनाच्या अंतरिम अहवालानुसार, गळा दाबल्यामुळे श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व बाबींचा सखोल तपास करून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला असून, आरोपी राजेश गोपाल भुक्या याला अटक केले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मदन दिवटे करीत आहे.

प्रेमसंबधातून झाले होते लग्न

मृतक भाग्यलक्ष्मी ही मंचेरीयाल, तेलंगणा येथील असून तिचे अगोदर लग्न झाले होते. तिला ११ व ८ वर्षाचे दोन मुले आहेत. नंतर तिचे प्रेमसंबंध १० वर्षांनी लहान असणारा आरोपी राजेश सोबत झाले होते. ते मंचेरीयाल येथून पळून येऊन बल्लारपूर येथे पती पत्नी म्हणून राहत होते. ही घटना संशयातून घडली असावी असा संशय वर्तविण्यात आला आहे.

Pakistan Coup : पाकिस्तानात ‘पाळीव साप’ मालकालाच चावणार? लष्कर-ए-तैयबाचे असीम मुनीर यांना उघड आव्हान; सत्तापालटाची चिन्हे

Web Title: A man murder his wife after clashes with her incident in chandrapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • chandrapur news
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
1

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
2

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Maharashtra Live breaking News in Marathi:  आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक
3

Maharashtra Live breaking News in Marathi: आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक

Crime News: सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद; काडतूस सापडताच हत्येचा उलगडा, सीसीटीव्हीत दोन हल्लेखोर कैद
4

Crime News: सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद; काडतूस सापडताच हत्येचा उलगडा, सीसीटीव्हीत दोन हल्लेखोर कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.