पत्नीला दागिन्याचा मोह नडला, कर्जबाजारी पतीने रात्रीच घात केला; पोलिसांना संशय आला अन्...
उत्तूर : कुठल्याही अडीअडचणीला उपयोगी पडणारी वस्तू म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. आज सुद्धा महिला वर्ग विविध अलंकार सोन्याचे करून ठेवतात. त्याला पतीची ही साथ मिळते. पण केलेले दागिने मोडण्यास नकार दिल्याने पत्नीला दागिन्याचा मोह नडला आणि पतीनेच एका घावात दोन तुकडे करून पत्नीचा घात केला. ही घटना आहे आजरा तालुक्यातील मडीलगे या गावातील.
मागील दोन दिवसांत मडिलगे (ता. आजरा) येथे चौघा सशस्त्र दरोडेखोरांनी माजी उपसरपंच सुशांत गुरव यांच्या घरावर दरोडा टाकून त्यांची पत्नी पूजा गुरव यांचा निर्घृण खून केला. अशी फिर्याद आजरा पोलिसांत पती सुशांत गुरव यांनी दिली होती. दरोडेखोरांनी पूजा यांच्या गळ्यातील दागिने व रोख रक्कम लंपास केले आहेत, असे फिर्यादीत सांगितले. पण यामध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे विविध दिशेने फिरवली. मात्र, चोराची पावले ओळखणारी पोलीस इतके हुशार असतात की पाण्याने भरलेल्या बादलीतील पेला सुद्धा ते अलगद उचलतात, अशीच गत या घटनेबाबत घडली आणि दरोड्याचे भिंग बाहेर फुटलं.
मडीलगे येथे राहत असलेला सुशांत गुरव शांत स्वभावाचा तसेच माळकरी वर्गातला असल्याने भजन, कीर्तन देत गावोगावी प्रबोधन करायचं. वडील आचारी असल्याने त्याने आचाऱ्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर या व्यवसायात जम न बसल्याने त्याने कोल्हापुरात नोकरीही केली. त्यानंतर कालांतराने हमिदवाडा कारखाना येथे नोकरी लागला. पण या ठिकाणी त्याचं मन रमत नसल्याने ती नोकरी त्याने सोडली. आणि व्यवसाय करू लागला. या व्यवसायातून त्याने आपल्या पत्नीची हौस भागवण्यासाठी सोन्याचे दागिने केले होते.
दरम्यानच्या काळात तो कर्जबाजारी झाला. लोकांची घेतलेले कर्ज परत फिटणे न झाल्यामुळे तो बेचैन झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी त्याने पत्नीकडे दागिने गहाण ठेवून लोकांची कर्ज भागवूया, असे सतत सांगत होता. मात्र, पत्नीने आपले दागिने मोडण्यास अथवा गहाण ठेवण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला.
रविवारी रात्री एकच्या सुमारास सोन्याची दागिने देण्याच्या कारणावरून पत्नीशी जोरदार भांडण झाले. यातूनच त्याच्या मनात राग निर्माण होऊन जवळच असलेली लोखंडी खोरे डोक्यात मारल्याने पत्नी जागीच ठार झाली. यावेळी त्याने पत्नी मृत पावल्याची खात्री करून अंगावर असलेले संपूर्ण दागिने काढून घेतले. हे काढलेले दागिने एका पिशवीत घालून घरातच त्याने लपवून ठेवले होते. त्यानंतर आजरा पोलिसात फिर्याद देऊन या फिर्यादीत तीन-चार दरोडेखोर आपल्या घरात शिरून दरोडेखोरांनी पत्नीच्या डोक्यात लोखंडी वार करून दागिने व रोख रक्कम घेऊन पळून गेल्याचे सांगितले होते.
पोलिसांना संशय आला अन्…
पोलिसांनी तपास करत असताना पत्नीच्या अंगावरील दागिने घरीच पोलिसांना सापडल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तपासासाठी श्वान पथकास पाचारण करून तपास सुरू केला. मात्र, हे श्वान घटना ठिकाणीच घुटमळले. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला विश्वासात घेऊन सुशांत गुरवला सर्व माहिती काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने नकार दिला. पण नंतर पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. कर्जबाजारी झाल्यामुळे सदरचे कर्ज फेडण्यासाठी पत्नीने दागिने देण्यास नकार दिल्याने आपण तिचा खून केला असल्याची त्याने पोलिस तपासात सांगितले.