कल्याण तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी इंस्टाग्रामवर मैत्री, नंतर ब्लॅकमेलिंग, शेवटी व्हिडीओ कॉल करून तरुणीने आत्महत्या केल्याचा समोर आला आहे. टिटवाळ्यात प्रियकराच्या जाचाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली आहे. या नराधमाने अनेक तरुणीशी प्रेम संबंध प्रस्थापित करून लुटल्याचा आरोप केला जात आहे.
Crime News: ‘छाती, पोट आणि पाठीवर १० ते १२ वार’, पतीकडून धारदार हत्याराने पत्नीची निर्घृण हत्या
नेमकं काय आहे प्रकरण?
कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कदायक घटना घडली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर हीच ओळख प्रेमसंबंधात बदलली. त्यानंतर यात बालमेलींग सुरु झाली. अखेर एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक तरुणीची ओळख आरोपी ऋतिक रोहने याच्याशी शाशल मीडियावर झाली. सुरुवातीला मैत्री झाल्यानंतर ती प्रेमात बदलली. या नात्याचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्याकडून दागिने घेतले. एवढेच नाही तर तिचे व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देण्यात आली. याच मानसिक दबावाला आणि सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने थेट व्हिडीओ कॉलदरम्यान गळफास घेऊन जीवन संपवले.
या घटनेनंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, आरोपी ऋतिक रोहनेने केवळ मृतक तरुणीलाच नव्हे तर इतर काही मुलींनाही अश्याच प्रकारे फसवल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरु केली आहे. कल्याण ग्रामीण आणि टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा तापास करत असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Satara Crime: आरोपीने पोलिसांवर केला कोयत्याने हल्ला,पोलिसांनी थेट एन्काऊंटरच केला
सातारा जिल्ह्यातून एक खळबळजनक प्रकार सामोर आला आहे. सातारा शहर पोलिसांवर पुणे येथील शिक्रापूरमध्ये कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हल्ला करणाऱ्या आरोपीचा शिक्रापूर येथे सातारा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. लखन भोसले असे एंकॉउंटर झालेल्या आरोपीचे नाव आहे. लखन भोसलेला जबरी चोरी प्रकरणात अटक करण्यासाठी पोलीस गेले होते. त्यावेळी त्याने पोलिसांवर हल्ला चढवला. यात चार पोलीस गंभीर जखमी झाले आहे.
थेट एन्काऊंटर
हल्ला चढवल्यानंतर पोलिसांनी थेट त्याचा एन्काऊंटर केला. आरोपी लखन भोसले हा खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील रहिवासी आहे.लखन भोसलेवर सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात जबरी चोरीसह दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन दिवसापूर्वी महिलेच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करुन फरार झालेल्या लखन भोसले या आरोपीला शोधण्यासाठी सातारा पोलिसांचे पथक शिक्रापूर येथे गेले असताना ही घटना घडली आहे.