(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केला आहे. ज्या व्हिडिओमध्ये तो अभिनेता अहान शेट्टीला एक खान विनंती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले, ”जर अहान शेट्टीने कमेंट केली, तर मी माझ्या पगारातून मित्रांना बॉर्डर २ दाखवायला नेईन” किंवा ” जर सुनील शेट्टीनं कमेंट केली, तर मी ४० वर्षांनंतर थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहिन”, अशा प्रकारच्या अनेक रील्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
खास गोष्ट म्हणजे अहान शेट्टी जवळपास प्रत्येक रीलला उत्तर देत आहे. त्यानं स्वत: सांगितले की, या कमेंट्स तोच करीत आहे. त्यामुळे जर अहान शेट्टीनं कमेंट केली, तर सोशल मीडियावर हा ट्रेंडच बनाला आहे.
अशातच अभिनेता रितेश देशमुखनंही हा ट्रेंड फॉलो केला आहे. रितेश नेहमी सोशल मीडियावर अनेक फोटो- व्हिडिओ शेअर करतो आणि आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.
रितेशचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अहान शेट्टीने कमेंट केली, “हा हा हा, खूप खूप प्रेम सर, तुम्ही नेहमीच मला बिनशर्त पाठिंबा दिला आहे आणि हीच गोष्ट मी या प्रवासात नेहमीच माझ्यासोबत घेऊन जाईन. मी मनापासून तुमचा खूप आभारी आहे.” रितेशने लगेच अहानच्या पोस्टला उत्तर दिले, “वाह!!!! आत्ताच तिकिटे बुक करतो!!!!!! माझ्या लहान भावा, तुला खूप प्रेम आहे – ब्लॉकबस्टर लोडिंग.”
बॉर्डर २ हा आगामी भारतीय हिंदी भाषेतील अॅक्शन-पॅक्ड युद्ध चित्रपट आहे जो अनुराग सिंग यांनी सह-लेखन आणि दिग्दर्शित केला आहे. हा जेपी दत्ता यांच्या १९९७ च्या ब्लॉकबस्टर चित्रपट बॉर्डरचा सिक्वेल आहे आणि टी-सीरीज फिल्म्स आणि जेपी फिल्म्सच्या बॅनरखाली भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता यांनी निर्मित केला आहे.
‘बॉर्डर २’ चा रन टाइम किती आहे?
या युद्ध चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने कोणत्याही कट-शिवाय मान्यता दिली आहे आणि प्रमाणपत्रावर त्याचा रन टाइम ३ तास १६ मिनिटे असा नमूद केला आहे, ज्यामुळे तो बॉलीवूडमधील सर्वात लांब युद्ध चित्रपटांपैकी एक हा चित्रपट ठरला आहे. अनुराग सिंग दिग्दर्शित, सनी भारतीय सैन्याच्या ६ व्या शीख रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल फतेह सिंग क्लेर यांची भूमिका साकारणार आहे. वरुण धवन मेजर होशियार सिंग दहिया यांची भूमिका साकारणार आहे, दिलजीत फ्लाइंग जनरल ऑफिसर निर्मल जीत सिंग सेखोन यांची भूमिका साकारणार आहे आणि अहान शेट्टी लेफ्टनंट कमांडर एमएस रावत यांची भूमिका साकारणार आहे.






