Maharashtra breaking News Marathi (Credit- AI)
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या गैरप्रकारामुळे चर्चेत आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ चक्क पुरुषांनी लाटल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यात उघडकीस आला आहे.
06 Feb 2026 06:20 PM (IST)
Yuki Bhambri’s commentary on the doubles format of tennis : एकेकाळी भारताच्या सर्वोत्तम एकेरी खेळाडूंपैकी एक मानला जाणारा युकी भांब्रीची कारकीर्द अनपेक्षित पण शिकण्याची वाटचाल राहिली आहे. एटीपी रँकिंगमध्ये टॉप १०० मध्ये स्थान मिळवल्यानंतर लगेचच दुखापतींमुळे त्याची एकेरी कारकीर्द थांबली. प्रायोजकत्वाच्या अनिश्चिततेमुळे आव्हाने वाढली आणि या स्वरूपाबद्दल त्याच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात अपूर्ण राहिल्या. भारताचा अव्वल दुहेरी खेळाडू म्हणून युकी त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीतील सर्वात यशस्वी टप्प्यात आहे.
06 Feb 2026 06:02 PM (IST)
06 Feb 2026 05:55 PM (IST)
भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर केलेला टिकी नंतर आता रामदास कदमांचाही पलटवार केला आहे भास्कर जाधव हप्तेबाज आहे अशा स्वरूपाचा खवजळक आरोप रामदास कदम यांनी केला आहे तर सुनील तटकरे हे दगाबाज असून विधानसभेला भास्करराव जाधव या ठाकरेंच्या आमदाराला निवडून आणण्यासाठी सुनील तटकरे यांनीच मदत केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे
06 Feb 2026 05:45 PM (IST)
कुणाल कामराची पुन्हा मुंबई हायकोर्टात धाव... सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर काढण्याच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करून ते काढण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या 'सहयोग पोर्टल'ला आणि त्याविषयीच्या माहिती तंत्रज्ञान नियमावलीतील दुरुस्तीला याचिकेद्वारे दिले आव्हान... हायकोर्टाने १६ मार्च रोजी ठेवली सुनावणी...
06 Feb 2026 05:30 PM (IST)
तत्कालीन 2023 मंधिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूंटेफळ ते वाहिरा रस्त्यासाठी पाच कोटी रुपये निधी सामाजिक कार्यकर्ते अशोक माने यांनी बीड येथील बालेपिर येथे मोबाईल टावरवर चढून आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रस्त्यासाठी तब्बल 5 कोटी रूपये निधी वितरीत करण्यात आला. हा खुंटेफळ ते वाहिरा हा रस्ता गेली तीन वर्षात अवघ्या दोन किमी रस्ताच करण्यात आला आहे, उर्वीत रस्ता हा झालाच नसल्याने सामाजिक कार्यकर्ते अशोक माने यांनी चक्क बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांच्याशी चर्चा करुण हा रस्ता तात्काळ दुरूस्त करण्याची मागणी केली आहे.
06 Feb 2026 05:23 PM (IST)
रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय भविष्याचा फैसला करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. ५६ गट आणि ११२ जागांसाठी होणाऱ्या या रणधुमाळीत प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस बंदोबस्त सज्ज झाला आहे. …
06 Feb 2026 05:13 PM (IST)
अमरावती महापालिकेच्या १७ व्या महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवानी यांची निवड झाली असून, शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच सिंधी समुदायाला मानाचे महापौरपद मिळाले आहे.
06 Feb 2026 05:03 PM (IST)
टीम इंडियाला खिलन पटेलच्या रूपाने आठवा धक्का बसला आहे. खिलन पटेल 4 चेंडूत 3 धावा करून बाद झाला. शेवटच्या 2 विकेट हाती असून 400 धावा गाठणार का? असा प्रश्न आहे.
06 Feb 2026 04:40 PM (IST)
मागील काही दिवसांपासून खा. प्रतिभा धानोरकर व आ. विजय वडेट्टीवार यांच्यातील वादावर अखेर दिल्ली येथे बुधवारी (दि.४) रात्री पडदा पडला. चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा तिढा अखेरीस सुटला. धानोरकर गटाचा महापौर तर वडेट्टीवार गटाकडे गटनेता व उपमहापौर देण्याचे ठरले. काँग्रेसचे गटनेता म्हणून आ. वडेट्टीवार गटाचे राजेश अडूर यांची निवड करण्यात आली आहे. तर महापालिकेत उपमहापौरपदी आ. विजय वडेट्टीवार गटाचे वसंत देशमुख यांनी अर्ज भरला आहे.
06 Feb 2026 04:30 PM (IST)
राणी मुखर्जीचा “मर्दानी ३” हा बॉलीवूड चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन एक आठवडा पूर्ण करत आहे. पण या महत्त्वाच्या काळात, चित्रपटाचे कलेक्शन फारसे प्रभावी दिसत नाही. सुरुवातीला चित्रपटाने लक्षणीय वाढ केली होती, परंतु त्यानंतर, त्याचे कलेक्शन कमी झाले आहे, सध्या ते २ कोटींच्या आसपास आहे. आठवड्याच्या शेवटी कलेक्शन वाढण्याची अपेक्षा आहे, परंतु त्यानंतरही, चित्रपटाचे भविष्य सोपे असणार नाही. सुरुवातीला मर्दानीला “बॉर्डर २” सोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर मिळाली होती, परंतु आता त्याचा सामना शाहिद कपूरच्या “ओ रोमियो” शी होईल.
06 Feb 2026 04:25 PM (IST)
शिवसेना शिंदे गटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला ९ फेब्रुवारी रोजीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र दुःखाच्या छायेत असताना आपण कोणताही सोहळा, समारंभ किंवा जल्लोष करणे उचित नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
06 Feb 2026 04:15 PM (IST)
नांदेड जिल्ह्यात मागील काही वर्षांत चिमुरड्या मुलींवरील अत्याचार, विनयभंग आणि अमानुष हत्यांचे प्रकार सातत्याने समोर येत असून, या घटनांनी संपूर्ण समाजमन हादरून गेले आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी कडक कायदे अस्तित्वात असतानाही अशा घटनांची पुनरावृत्ती होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. प्रत्येक घटनेनंतर संताप व्यक्त केला जातो, मात्र काही काळानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होत असल्याचे चित्र दिसून येते.
06 Feb 2026 04:10 PM (IST)
भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आज अंडर-१९ विश्वचषक अंतिम सामन्यात हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर भारत १९ वर्षांखालील आणि इंग्लंड १९ वर्षांखालील संघ जेतेपदासाठी आमनेसामने आले आहेत. या समण्यापूर्वी भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने ५५ चेंडूत शतक झळकवले आहे.
06 Feb 2026 04:05 PM (IST)
अल्पवयीन मुलीला फोनद्वारे संपर्क साधून रात्री घराबाहेर दुसऱ्या ठिकाणी बोलावून तिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित ओंकार लक्ष्मण कोकरे याला सिंधुदुर्गचे अतिरीक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी ५० हजार रुपयांच्या जाचमुचलक्याच्या सशर्थ जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. संशयित आरोपीच्या वतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. नुकत्याच झालेल्या जुजबी ओळखीतून रात्री ८.३० ते ११ वा. च्या मुदतीत पडित अल्पवयीन मुलीला फोनद्वारे संपर्क साधून तुझ्याशी फ्रेंडशिप करायची आहे, असे सांगून घराबाहेर बोलावले.
06 Feb 2026 03:50 PM (IST)
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिम उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये आणखी एक मोठा बदल होणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे बांधकाम सुलभ करण्यासाठी गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यानच्या लोकल ट्रेन सेवा सुमारे तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या ब्लॉकमध्ये विशेषतः दुसऱ्या टप्प्यातील सर्वात गुंतागुंतीच्या विभागांपैकी एक असलेल्या वांद्रे-खार उड्डाणपुलाचे पाडणे आणि पुनर्बांधणीचा समावेश असेल. हे काम पश्चिम रेल्वे मुंबई मध्य-बोरीवली सहाव्या मार्ग प्रकल्पाचा भाग म्हणून करत आहे. प्रकल्पाची किंमत ₹९६४.८४ कोटी आहे आणि सध्या भौतिक प्रगती ७०% आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२७ मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
06 Feb 2026 03:40 PM (IST)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी अपघात झाला आहे. मुंबहून बारामतीला जाताना लॅंडिगवेळी हा अपघात झाला. यामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी बारामतीमध्ये येत होते. मात्र धावपट्टीच्या अगदी शेजारी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातावरुन काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सवाल उपस्थित केला आहे.
06 Feb 2026 03:35 PM (IST)
नांदेड महानगरपालिकेच्या महापौरपदाची (Nanded News) माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजपच्या वतीने महापौर पदाच्या उमेदवाराचे नाव उद्या शुक्रवारी अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौर पदासाठी अनेक महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत. यामध्ये सध्या कविता संतोष मुळे, ज्योती किशन कल्याणकर, अनुराधा राजू काळे, शांभवी प्रवीण साले, वैशाली मिलिंद न देशमुख आणि सुदर्शना महेश खोमणे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे
06 Feb 2026 03:25 PM (IST)
भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आज अंडर-१९ विश्वचषक अंतिम सामन्यावर लागून राहिले आहे. हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर भारत १९ वर्षांखालील आणि इंग्लंड १९ वर्षांखालील संघ जेतेपदासाठी आमनेसामने आले आहेत. या समण्यापूर्वी भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर इंग्लंड संघ प्रथम गोलंदाजी करत आहे. या स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघ स्पर्धेत अपराजित राहिले आहेत, त्यामुळे अंतिम सामना चांगलाच रोमांचक होणार आहे.
06 Feb 2026 03:15 PM (IST)
कोकणाचा दहावी-बारावीचा निकाल राज्यात नेहमीच आघाडीवर असतो. ९० ते १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इथे मोठी असून त्यात मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे. मेहनत, सातत्य आणि शिक्षणाची आवड यामुळे कोकणातील मुली शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणापर्यंत सहज पोहोचतात. मात्र याच शिक्षणप्रगतीमुळे कोकणात एक गंभीर सामाजिक प्रश्न उभा राहत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. उच्च शिक्षणानंतर कोकणात पुरेशा रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने बहुसंख्य मुली शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरांकडे वळतात. नंतर नोकरी लागली की शहरातील जीवनशैलीशी त्या रमतात.
06 Feb 2026 03:10 PM (IST)
पद्मभूषण पुरस्कार विजेते अभिनेते अनुपम खेर यांनी दिल्लीमध्ये त्यांच्या प्रीमियर अॅक्टिंग स्कूल ‘अॅक्टर प्रिपेयर्स’चे नवीन सेंटर सुरू केले आहे. हे सेंटर नवी दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेव येथे कार्यरत असून, मुंबईतील मुख्य केंद्रांनंतर स्कूलच्या विस्ताराच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यामुळे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकारांना आता जागतिक दर्जाचे अभिनय शिक्षण त्यांच्या स्वतःच्या शहरात घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
06 Feb 2026 03:05 PM (IST)
नांदेडच्या विकासाची एक्स्प्रेस सुपरफास्टपणे धावत असून खासदार गोपछडे व मी दोघेही प्रयत्न करत आहोत, ही अतिशय चांगली बाब आहे, असे म्हणत खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिल्लीतील गाठीभेटी सत्रांवर मार्मिक टिप्पणी केली. ही राजकीय स्पर्धा नव्हे तर विकासाची स्पर्धा आहे असेही ते यावेळी म्हणाले. विकासाच्या स्थानिक प्रश्नांवर गांभीर्यपूर्वक काम केले जात असून नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, मनपाची एकंदरीत परिस्थिती व शहरातील विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांची माहिती आपण मुख्यमंत्र्यांना दिली असून त्यांनी शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, असे खासदार चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
06 Feb 2026 02:45 PM (IST)
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. निधनाच्या तिसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या निधनाला ७२ तासही उलटत नाहीत, तोपर्यंत सुनेत्रा पवारांनी अशाप्रकारे शपथ घेतल्याने यावर विरोधकांकडून टीका होत आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांना शह देण्यासाठी हा शपथविधी घडवून आणला, असा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.
06 Feb 2026 02:40 PM (IST)
नांदेडच्या विकासाची एक्स्प्रेस सुपरफास्टपणे धावत असून खासदार गोपछडे व मी दोघेही प्रयत्न करत आहोत, ही अतिशय चांगली बाब आहे, असे म्हणत खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिल्लीतील गाठीभेटी सत्रांवर मार्मिक टिप्पणी केली. ही राजकीय स्पर्धा नव्हे तर विकासाची स्पर्धा आहे असेही ते यावेळी म्हणाले. विकासाच्या स्थानिक प्रश्नांवर गांभीर्यपूर्वक काम केले जात असून नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, मनपाची एकंदरीत परिस्थिती व शहरातील विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांची माहिती आपण मुख्यमंत्र्यांना दिली असून त्यांनी शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, असे खासदार चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
06 Feb 2026 02:35 PM (IST)
पद्मभूषण पुरस्कार विजेते अभिनेते अनुपम खेर यांनी दिल्लीमध्ये त्यांच्या प्रीमियर अॅक्टिंग स्कूल ‘अॅक्टर प्रिपेयर्स’चे नवीन सेंटर सुरू केले आहे. हे सेंटर नवी दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेव येथे कार्यरत असून, मुंबईतील मुख्य केंद्रांनंतर स्कूलच्या विस्ताराच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यामुळे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकारांना आता जागतिक दर्जाचे अभिनय शिक्षण त्यांच्या स्वतःच्या शहरात घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
06 Feb 2026 02:30 PM (IST)
हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला विशेष महत्त्व आहे. ते येणाऱ्या काळातील शुभ आणि अशुभ देखील मानले जाते. ग्रहांच्या हालचालीमुळे केवळ राशीच नाही तर एका निश्चित कालावधीत नक्षत्र देखील बदलते. ज्याचा परिणाम काही राशीच्या लोकांवर विविध प्रकारे होताना दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा आत्मविश्वास, स्वाभिमान आणि नेतृत्वासाठी जबाबदार ग्रह मानला जातो. तो दर महिन्याला आपली राशी बदलतो आणि याचा परिणाम सर्व १२ राशींवर होतो. सूर्य आणि शनि युतीचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
06 Feb 2026 02:25 PM (IST)
मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुका उद्या, शनिवारी (७) होणार आहेत. पण त्यापूर्वी मालेगावच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( AIMIM) चे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माइल आणि माजी महापौर अब्दुल मलिक यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत महापौर आणि उपमहापौर निवडणुकीची रणनीती निश्चित झाल्याचे मानले जाते.
06 Feb 2026 02:20 PM (IST)
२००६ मध्ये प्रदर्शित झालेला कॉमेडी-थ्रिलर चित्रपट “भागम भाग” सुपरहिट झाला. त्यात अक्षय कुमार, गोविंदा, परेश रावल, राजपाल यादव आणि इतर कलाकारांनी भूमिका केल्या होत्या, ज्यांच्या भूमिकांनी भरपूर मनोरंजन केले होते. आता, सिक्वेल प्रदर्शित होणार असल्याची बातमी पसरली आहे. परंतु, गोविंदा या चित्रपटात दिसणार नाही. मनोज बाजपेयीने या मोठ्या अभिनेत्याची जागा घेतली असल्याचे समोर आले आहे.
06 Feb 2026 02:15 PM (IST)
केंद्र सरकारच्या संप्रभु बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रकल्प ‘भारतजेन’चे काम वेगाने प्रगतीपथावर असून, या महिनाअखेरपर्यंत २२ भारतीय भाषांमध्ये मजकूर-आधारित (टेक्स्ट) सेवा पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली. ‘भारतजेन’ हा ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेला सरकारी उपक्रम असून, देशासाठी स्वदेशी व सुरक्षित एआय मॉडेल विकसित करणे हा त्याचा उद्देश आहे. मंत्री सिंह यांनी सांगितले की, भारतजेन एआयचा विकास ही सतत चालणारी प्रक्रिया असून, भविष्यात आणखी भाषा व बोलीभाषांचा समावेश करता येईल.
06 Feb 2026 02:10 PM (IST)
रत्नागिरी: रत्नागिरी शहरात एका महाविद्यालयात नामांकित शिकवणाऱ्या शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीवर सतत पाच वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या नराधम शिक्षकाला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी ही केली जात आहे.
06 Feb 2026 02:03 PM (IST)
US citizens leave Iran immediately warning 2026: जगावर पुन्हा एकदा युद्धाचे सावट गडद झाले आहे. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास संघर्षानंतर आता अमेरिका आणि इराण (US Iran war tension) एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अमेरिकेने इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या नागरिकांसाठी ‘Red Alert’ जारी केला असून, त्यांना विनाविलंब इराण सोडण्याचे आदेश दिले आहेत. वॉशिंग्टन आणि तेहरानमधील तणाव आता अशा स्तरावर पोहोचला आहे जिथून कधीही युद्धाची ठिणगी पडू शकते.
06 Feb 2026 02:02 PM (IST)
जनकपुरी भागात खड्ड्यात पडून झालेल्या दुचाकीस्वाराच्या मृत्यूबद्दल भाजप खासदार रामवीर सिंह बिधुरी म्हणाले, "...या घटनेची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे आणि देशाच्या राजधानीत कोणत्याही किंमतीत अशी निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही असा संदेश दिला पाहिजे..." असे ते म्हणाले आहेत.
06 Feb 2026 01:55 PM (IST)
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. संसदेच्या मकर गेटवर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरुद्ध निदर्शने केली.
#WATCH विपक्षी सांसदों ने संसद के मकर द्वार पर सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। pic.twitter.com/TeJQLB0v8k
— ANI_HindiNews (@AHindinews) February 6, 2026
06 Feb 2026 01:45 PM (IST)
पंजाबचे आप नेते लकी ओबेरॉय यांच्यावर मॉडेल टाउनमधील गुरुद्वारा साहिब यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत भाजप नेते जयवीर शेरगिल म्हणाले, "पंजाबमध्ये आप सरकार सत्तेत आल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था गुंड आणि गुंडांसाठी फक्त खेळणी बनली आहे. आप सरकारने गुंडांसमोर शरणागती पत्करली आहे... संपूर्ण प्रशासन जनतेची नव्हे तर केजरीवालची सेवा करण्यात व्यस्त आहे. आप सरकार हे एक निरुपयोगी सरकार आहे जे दिल्ली किंवा पंजाबला सांभाळू शकत नाही." अशी टीका त्यांनी केली.
06 Feb 2026 01:35 PM (IST)
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला पाटणा उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. आदर्श आचारसंहितेदरम्यान महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता.
06 Feb 2026 01:25 PM (IST)
मध्य प्रदेशातील इंदूर येथे झालेल्या सार्वजनिक तक्रार निवारण सुनावणीदरम्यान, रामेश्वरने निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान स्वतःचे आणि आपल्या वृद्ध आईचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले असून पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी एका मतदाराने केली. यावेळी अधिकाऱ्यांना विनंती करताना या व्यक्तीला अश्रू अनावर झाले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
06 Feb 2026 01:15 PM (IST)
तुइबोंग बाजाराजवळ हिंसाचार उसळला आहे. याचे कारण आंदोलकांनी मुख्यमंत्री युम्नाम खेमचंद सिंग यांच्यासोबत कुकी आमदार नेमचा किपगेन आणि लोसी दिखो यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला विरोध केला. कुकी-झो गटांनी याला विश्वासघात म्हटले, आणि पाठिंबा देणाऱ्या आमदारांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची व २४ तासांच्या बंदची घोषणा केली, तर एका सशस्त्र गटाने किपगेन यांच्यावर बक्षीस जाहीर केले. २०२३ पासून झालेल्या वांशिक संघर्षात २६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आल्यानंतर ही अशांतता पसरली आहे. नवीन मंत्रिमंडळाचे उद्दिष्ट मेईतेई, कुकी आणि नागा समुदायांमध्ये सर्वसमावेशकता आणणे आहे, परंतु वाढीव सुरक्षा व्यवस्था आणि विधानसभेतील बहुमत सिद्ध करूनही तणाव कायम आहे.
06 Feb 2026 01:05 PM (IST)
खासदार संजय राऊत म्हणाले की, "आपण एपस्टीन फाइल्समध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्रीही आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचा या लोकांशी संबंध असल्याचं उघड झालं आहे. मोदी सरकार या सँकडलमध्ये अडकलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता. एपस्टिन सोबत या सरकारचे मंत्री किती नाजूक आणि मधूर संबंध ठेवून होते हे तुम्ही पाहिलं आहे. हरदीप पुरींनी आपल्या पदाचा गैरवापर करून एपस्टिनच्या लोकांना भारतात येण्याचा व्हिसा दिला आहे. हे मोदींच्या संमतीने झालं नसेल का?" असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
06 Feb 2026 01:03 PM (IST)
अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६ गटासाठी व पंचायत समितीच्या १२ गणासाठी शनिवार ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. आ. सचिन कल्याणशेट्टी विकास कामांच्या जोरावर मतदार संघावरील वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी झुंजणार आहेत. तर माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे कांग्रेसला जय महाराष्ट्र करीत धनुष्यबाण हाती घेतल्यावर मतदारांकडून कितपत यश मिळते याची चाचपणी करणार रणनिती ठरवणार असा अंदाज आहे . या जिप प स निवडणुकीत नवी पिढी नवे नेतृत्व उदयास येणार आहे असुन ‘मॅन ‘ ‘ मनी ‘ मसल ‘ याचा महापुर मतदार संघात येत असल्याची चर्चा रंगली आहे.
06 Feb 2026 12:53 PM (IST)
गेल्या अनेक दिवसांपासून स्मार्टफोन यूजर्सना ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो क्षण अखेर आता आला आहे. साऊथ कोरियाई टेक कंपनी सॅमसंगने बहुप्रतिक्षित Samsung Galaxy A07 5G अखेर आता भारतात लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन बजेट किंमतीत लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला नवीन हँडसेट सध्या कंपनीच्या वेबसाईटद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे. लेटेस्ट सॅमसंग गॅलेक्सी A07 5G स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरज कॉन्फिगरेशनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हे डिव्हाईस तीन रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. सॅमसंगच्या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे.
06 Feb 2026 12:43 PM (IST)
आरबीआयची चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) यांच्यासोबत पहिली बैठक झाली. या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात कोणताही बदल होणार नाही, तसेच रेपो दर ५.२५% वर कायम राहील अशी घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर एमपीसीची ही पहिलीच बैठक होती. व्याजदर आणि अर्थव्यवस्थेबाबत कोणते संकेत मिळतात हे पाहण्यासाठी बाजार, कर्जदार आणि गुंतवणूकदार बैठकीच्या निकालांवर बारकाईने लक्ष ठेवून होते. रेपो दरात बदल न झाल्याने कर्जाच्या दरांवर कोणताही परिणाम होणार नाही. ज्यामुळे कर्जदारांना कोणताही दिलासा मिळाला नाही.
06 Feb 2026 12:33 PM (IST)
जगातील दोन सर्वात मोठ्या अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधील ५० वर्षांचा शांतता काळ आता संपण्याच्या मार्गावर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचा अण्वस्त्रांची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव अधिकृतपणे फेटाळला आहे. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘न्यू स्टार्ट’ (New START) या कराराची मुदत संपल्यानंतर, ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, जुन्या आणि कुचकामी करारांना चिकटून राहण्यापेक्षा अमेरिका आता स्वतःची लष्करी ताकद “पूर्वी कधीही न पाहिलेल्या स्तरावर” नेणार आहे.
06 Feb 2026 12:23 PM (IST)
केंद्र सरकारच्या पुढाकाराने सहकारी मॉडेलवर आधारित ‘भारत टॅक्सी’ ही नवीन राईड हेलिंग सेवा भारतात अधिकृतपणे सुरू झाली आहे. या लाँचमुळे कॅब अॅग्रीगेटर मार्केटमध्ये ओला आणि उबरला थेट आव्हान देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सेवेमुळे ड्रायव्हर्सना जास्त कमाई आणि प्रवाशांना पारदर्शक भाडे मिळेल असा दावा त्यांनी केला आहे. नवी दिल्ली मध्ये असलेल्या विज्ञान भवन येथे आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी भारत टॅक्सीची औपचारिक सुरुवात केली. या लाँचच्या निमित्ताने भारत टॅक्सी रॅलीदेखील आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये ड्रायव्हर्स आणि प्रवाशांनी भाग घेतला होता.
06 Feb 2026 12:13 PM (IST)
‘मेरी आवाज ही मेरी पहचान है’ या गाण्याच्या पक्ती ज्यांच्या आयुष्याला तंतोतंत लागू होतात त्या म्हणजे लता मंगेशकर. आपल्या मंत्रमुग्ध स्वरांनी त्यांनी अनेक पिढ्यांना संगीताची गोडी लावली. चार दशकांहून अधिक काळ गायन करुन लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी गायनाला वेगळ्या उंचीवर नेले. १९४० च्या दशकात त्यांनी पार्श्वगायनात स्वतःची ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, तेलगू, उर्दू अशा 30 भाषांमध्ये 25 हजार गाणी त्यांनी गायली. लता मंगेशकर यांची आज पुण्यतिथी. आज त्या आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांचे गाण आजही जीवंत आहे.
06 Feb 2026 12:03 PM (IST)
“मी कामाचा माणूस आहे, माझ्या कामाच्या जोरावर मत मागतो, ” हे वाक्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकारणाची ठळक ओळख ठरले होते. विकासकामे, प्रशासकीय पकड़, निर्णयक्षमता आणि ठोस कार्यपद्धती याच्या बळावर मतदारांसमोर उभे राहणे हीच त्यांची कायमची भूमिका होती. मात्र, त्यांच्या अपघाती निधनानंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय प्रचाराचे स्वरूप बदलत असल्याचे चित्र आता स्पष्टपणे दिसू लागले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून विकासकामपिक्षा भावनिक आवाहनांवर अधिक भर दिला जात असल्याचे जाणकारांचे मत आहे. “राष्ट्रवादीला एक मत म्हणजे अजितदादांना श्रद्धांजली,” असा भावनिक संदेश थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी सुरू आहे. प्रचार साहित्य, गावभेटी, बैठका आणि कार्यकर्त्यांच्या संवादात हा सूर ठळकपणे उमटताना दिसत आहे.
06 Feb 2026 11:57 AM (IST)
नाशिक महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणूक बिनविरोध झाली. महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आहेर तर उपमहापौरपदी शिंदे सेनेचे विलास शिंदे यांची निवड जाहीर झाली आहे.
06 Feb 2026 11:53 AM (IST)
जगभरातील शेअर बाजार आणि आखाती देशांच्या नजरा आज ओमानच्या मस्कट शहराकडे लागल्या आहेत. वर्षभरापासून सुरू असलेल्या टोकाच्या लष्करी तणावानंतर, आज अमेरिका (America) आणि इराण (Iran) यांच्यात अत्यंत महत्त्वाची अणू चर्चा (Nuclear Talks) पार पडत आहे. ओमानचे सुलतान मध्यस्थी करत असलेल्या या बैठकीकडे ‘शांततेची शेवटची संधी’ म्हणून पाहिले जात आहे. ही चर्चा यशस्वी झाली तर मध्य पूर्वेतील युद्धाचे ढग विरतील, पण जर ती फिस्कटली तर थेट लष्करी संघर्ष अटळ मानला जात आहे.
06 Feb 2026 11:43 AM (IST)
बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणात तिहार तुरुंगात सरेंडर झाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेत्याला ४ फेब्रुवारी रोजी शरण येण्याचे आदेश दिले होते. परंतु, अभिनेत्याने स्वतःला सरेंडर केल्यानंतर, राजपाल यादव पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात हजर झाले आणि दिलासा मागितला. अभिनेता म्हणाला की तो २५ लाख रुपये घेऊन आला आहे आणि उर्वरित रक्कम भरेल. परंतु, न्यायालयाने त्याला फटकारले आणि सांगितले की कोणत्याही दिलासाचा विचार करण्यापूर्वी सरेंडर करणे आवश्यक आहे.
06 Feb 2026 11:33 AM (IST)
एकीकडे लग्नाची गाणी, आनंदाचे वातावरण आणि वऱ्हाड्यांची लगबग सुरू असतानाच नियतीने क्रूर घाला घातला आहे. नेपाळच्या (Nepal) बैताडी जिल्ह्यात गुरुवारी रात्री एका भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. पुरचौडी नगरपालिकेत रात्री ८ च्या सुमारास वऱ्हाड्यांना घेऊन जाणारी एक बस नियंत्रणाबाहेर जाऊन खोल खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
06 Feb 2026 11:23 AM (IST)
व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबने त्यांच्या युजर्सची संख्या वाढवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत भाषेच्या अडथळ्यामुळे यूट्यूबवर युजर्सची संख्या मर्यादित होती. युजर्स सहसा अशा क्रिएटर्सचे व्हिडिओ समजू शकत नव्हते जे वेगळ्या भाषेत आहेत. म्हणजेच एखादा युजर जर मराठी असेल तर त्याला तमिळ किंवा बंगाली क्रिएटरचे व्हिडिओ समजण्यात अडचणी येत होत्या. मात्र आता यूट्यूब या समस्येचे समाधान घेऊन आले आहे.
06 Feb 2026 11:13 AM (IST)
देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत कंपनीचा नफा वार्षिक आधाराच्या तुलनेत ५५ टक्क्यांनी घसरून ६,६३०.५ कोटी झाला, जो गेल्या वर्षी याच कालावधीत १४,७८१.२ कोटी होता. गेल्या वर्षीच्या उच्च बेसमुळे नफ्यात घट झाली आहे. आर्थिक वर्ष २४ च्या डिसेंबर तिमाहीत एअरटेलने ७,५४५.६ कोटींचा नफा नोंदवला होता. या व्यतिरिक्त, नवीन कामगार संहितेमुळे २५६.८ कोटींच्या अतिरिक्त खर्चामुळे नफ्यात घट झाली आहे.






