सौजन्य- सोशल मिडिया
उद्योगपती विजय मल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी, सीबीआय न्यायालयाने इंडियन ओव्हरसीज बँकेशी निगडीत कर्ज चुकविल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. सीबीआय नुसार, विजय मल्ल्या यांनी 180 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले आहे. आता, मुंबईतील एका विशेष न्यायालयाने इंडियन ओव्हरसीज बँकेशी निगडीत कर्ज चुकवल्याप्रकरणी विजय मल्ल्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (नॉन बेलेबल वॉरंट) जारी केले आहे.
एके काळी ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये असून भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे. अप्रत्यक्षपणे, विजय मल्ल्याला यापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशी केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे.
आरोपपत्रामध्ये केलेले मल्ल्यावरील आरोप
आरोपपत्रानुसार, विजय मल्ल्याने 2007 ते 2012 दरम्यान तत्कालीन किंगफिशर एअरलाइन्ससाठी इंडियन ओव्हरसीज बँकेकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. तपास एजन्सीचे म्हणणे आहे की 2010 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेने SBI बँकेला किंगफिशर एअरलाइन्सच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एकरकमी रकमेच्या प्रस्तावावर विचार करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर इंडियन ओव्हरसीज बँकेसह 18 बँकांच्या कन्सोर्टियमने किंगफिशर एअरलाइन्ससोबत करार केला. किंगफिशरचे प्रवर्तक विजय मल्ल्या यांनी जाणूनबुजून फसव्या हेतूने परतफेडीची जबाबदारी पूर्ण केली नाही, असा आरोप आहे. यामुळे बँकेचे 141.91 कोटी रुपयांचे नुकसान झाले आणि कर्जाचे शेअर्समध्ये रुपांतर केल्यामुळे 38.30 कोटी रुपयांचे अतिरिक्त नुकसान झाले.
किंगफिशरचा मालक असलेल्या विजय मल्ल्याने मार्च 2016 मध्ये भारत सोडला आणि ब्रिटनमध्ये पलायन केले. जानेवारी 2019 मध्ये मल्ल्याला अनेक कर्ज थकबाकी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी बनवण्यात आले आहे.भारतीय बँकांना 9000 कोटींचा गंडा लावून पसार झालेला विजय माल्ल्या पसार झाला आहे. भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे. मल्ल्या हा आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर बंगलुरु सघाचा मालक होता. तसेच मद्य, एयरलाईन्स, रिअल इस्टेट कंपन्यांचाही मालक होता. फॉर्म्युला वनमधील फोर्स इंडिया ही त्याच्या मालकीची होती.