अकोल्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रणेच मित्राची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मृतकाचे नाव प्रकाश पंचू जोसेफ (वय अंदाजे 35) असे आहे. तर पवन विलास मोरे उर्फ ‘टकल्या’ असे आरोपीचे नाव आहे. आरोपी सध्या फरार आहे. ही घटना अकोला शहरातील रमाबाई नगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
HIT AND RUN: 19 वर्षीय तरुणीने उडवली स्कुटी, अपघातात महिलेचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश आणि पावन हे दोघेही चांगले मित्र होते. मंगळवारी रात्री ते रमाबाई नगर चौकात एकत्र दारू पीत होते. यावेळी त्यांच्यात काही कारणावरून शाब्दिक चकमक झाली. त्यातूनच पवन उर्फ ‘टकल्या’ने अचानक रागाच्या भरात प्रकाशवर दगडाने वार केले. या हल्ल्यात प्रकाश गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने प्रकाशला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत गोष्टीत केले. घटनेनंतर पवन मोरे हा घटनास्थळावरून पसार झाला.
पोलिसांनी त्याच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.
नांदेडमध्ये चोर समजून २४ वर्षीय युवकाची हत्या
नांदेड जिल्ह्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. ग्रामस्थांनी एका २४ वर्षीय युवकाला चोर समजून बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला. नेटग्रीड प्रणालीमुळे त्याची ओळख पटवण्यात आली. पुढे या प्रकरणाच्या तपासाला गती आली. आणि यांनतर तो चोर नसल्याच समजले. पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे.
धक्कादायक ! एकाच स्कार्फने गळफास घेऊन तरुण-तरुणीची आत्महत्या; सोलापुरात खळबळ