धक्कादायक ! एकाच स्कार्फने गळफास घेऊन तरुण-तरुणीची आत्महत्या; सोलापुरात खळबळ
सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच सोलापूरमध्ये एकाच स्कार्फचा वापर करून तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, अनेकवेळा अशा प्रकरणांमध्ये आत्महत्या करणारे प्रेमीयुगुल असतात. मात्र, या प्रकरणात हे दोघे मानलेले ‘भाऊ-बहीण’ असल्याचे समोर आले आहे.
सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली. यामध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्येही त्यांनी आम्ही भाऊ-बहीण आहोत, आमच्या नात्यावर संशय घेऊ नका, असा उल्लेख केला आहे. मृत युवकाचे नाव रोहित ठणकेदार असून, तो चालक म्हणून काम करत होता. युवतीचे नाव अश्विनी केशापुरे असून, तिने बी. फार्मसीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते.
हेदेखील वाचा : Uttarakhand Crime: ३ कोटींचे घर, रुग्णासोबत प्रेम, नंतर फावड्याने केला पतीचा गेम…, फिजिओथेरपी सेंटर चालवणारी पत्नी निघाली ‘खूनी’
नातेवाईकांच्या माहितीनुसार, रोहितने अश्विनीला बहीण मानले होते. सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातील एका बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावर त्यांचा मृतदेह सापडला. गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह होता.
दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. सोशल मीडियावरही ‘भाऊ-बहीण’ असल्याचे स्टेटस ठेवले होते.
हेदेखील वाचा : Kalyan News : सात वर्षे जेल यातना भोगल्यानंतर ‘तो’ झाला निर्दोष, कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
मुंबईत विद्यार्थिनीची आत्महत्या
मुंबईतील प्रसिद्ध साठ्ये कॉलेजमध्ये एका विद्यार्थींनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साठ्ये कॉलेज हे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील विलेपार्ले परिसरात आहे. गुरुवारी सकाळी या मुलीने साठ्ये महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.