सौजन्य - नवराष्ट्र टीम
मोहोळ नगरपरिषद आणि अनगर नगरपरिषदेची निवडणूक रंगली आहे. आजी- माजी नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. मोहोळ नगरपरिषदेची निवडणूकीची जबाबदारी माझ्यावर नाही, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. शरद पवार पक्षाचे खासदार हे रमेश कदम यांना सोबत घेऊन प्रचार करत आहेत, याच रमेश कदम यांनी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाविरोधात काम केल होते, असेही राजू खरे म्हणाले.
उरली सुरली त्याची पाटीलकी काढतो
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मोहोळ विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजू खरे यांनी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीबाबत माजी आमदार व भाजप नेते राजन पाटील यांना देखील ओपन चॅलेंज दिलं आहे. आगामी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वच नेत्यांना सोबत घेऊन निवडणूका लढवणार, त्या पाटलाची उरली सुरली पाटीलकी काढू, असा इशारा दिला आहे.






