नुकतचं केरळमध्ये एका पाच वर्षीय चिमुकलीवर तरुणाने अत्याचार करुन तिची हत्या केल्याची घटना समोर आली होती.या घटनेवरुन केरळमध्ये एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपील कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. ही घटना ताजी असतानाच, आता केरळमधे पुन्हा महिला अत्याचाराची घटना समोर येत आहे. कोल्लम येथे एका अमेरिकन महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
[read_also content=”1 लाख पगार, चित्रपटाची ऑफर आणि YouTube वरून कमाई.. सचिन-सीमाला तर लागली लॉटरी! https://www.navarashtra.com/india/seema-haidar-sachin-meena-get-job-offer-of-1-lakh-salary-fim-offer-nrps-439800.html”]
करुणागप्पल्ली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ती महिला मूळची अमेरिकेतील कॅलिफोर्नियाची आहे. 22 जुलै रोजी केरळमध्ये आली होती आणि कोल्लमजवळील एका आश्रमात राहत होती. 5 ऑगस्ट रोजी येथून निघणार होती. 31 जुलै रोजी ही घटना घडली जेव्हा 44 वर्षीय महिला आश्रमाजवळील समुद्रकिनाऱ्यावर एकटी बसली होती. महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्याकडे जाऊन सिगारेट शेयर करण्याची ऑफर दिली, असे पोलिसांनी सांगितले. महिलेने तसे करण्यास नकार दिल्याने त्यांनी तिला दारू पिण्याची ऑफर दिली त्यानंतर दारू पिऊन ती दारूच्या नशेत आली आणि त्यानंतर आरोपीने तिला मोटारसायकलवरून जवळच्या रिकाम्या घरात नेले, जिथे तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी महिलेने 1 ऑगस्ट रोजी रात्री पोलिसात तक्रार दाखल केली होती. पीडितेची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. आरोपी सध्या कोठडीत आहेत.जयन आणि निखिल अशी आरोपींची नावे आहेत.
तर दुसरीकडे केरळमध्ये 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी नवा खुलासा समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपीला पाच वर्षांपूर्वी दिल्लीत लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत एका प्रकरणात अटक करण्यात आली होती.अलुवा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक विवेक कुमार यांनी सांगितले की, अशफाक आलम या गुन्ह्याच्या संदर्भात दिल्लीत एक महिना तुरुंगात होता आणि नंतर जामिनावर बाहेर आला.पोलीस अधीक्षक म्हणाले, “10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून त्याला गाझीपूर पोलिसांनी 2018 मध्ये अटक केली होती.”