Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यायालयाच्या गेटवरच पत्नीला जाळण्याचा प्रयत्न; बाटलीने पेट्रोल अंगावर टाकलं अन्…

न्यायालयात एका जुन्या भांडणाची साक्ष देण्यासाठी आलेल्या महिलेला तिच्याच पतीने अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावरील न्यायालयाच्या गेटजवळ घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 18, 2026 | 01:06 PM
न्यायालयाच्या गेटवरच पत्नीला जाळण्याचा प्रयत्न; बाटलीने पेट्रोल अंगावर टाकलं अन्...

न्यायालयाच्या गेटवरच पत्नीला जाळण्याचा प्रयत्न; बाटलीने पेट्रोल अंगावर टाकलं अन्...

Follow Us
Follow Us:

सिल्लोड : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता सिल्लोडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यायालयात एका जुन्या भांडणाची साक्ष देण्यासाठी आलेल्या महिलेला तिच्याच पतीने अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि. १७) दुपारी चार वाजेच्या सुमारास सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावरील न्यायालयाच्या गेटजवळ घडली आहे. दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली होती.

 

अशोक मोठेबा चंदनशिव (वय ३२, रा. खुपटा, ता. सिल्लोड) असे आरोपी पतीचे तर लक्ष्मी (२८, रा. खुपटा, ह. मु. जालना) असे पत्नीचे नाव आहे. सदर महिला शुक्रवारी खुपटा गावातील जुन्या भांडणाची साक्ष देण्यासाठी न्यायालयात आली होती. तर आरोपी पतीही आलेला होता. साक्ष संपल्यानंतर न्यायालयाबाहेर येताच आरोपीने पत्नीला सोबत चालण्याचा हट्ट धरला. पत्नीने नकार देताच आरोपीने बॅगमधून पेट्रोल भरलेली बाटली काढली व अंगावर टाकली. पत्नीने आरडाओरडा करताच रस्त्यावरील नागरिक मदतीला धावले व पुढील अनर्थ टळला.

हे सुद्धा वाचा : पोलीस ठाण्यात विष प्राशन; सराईत गुन्हेगाराचा मृत्यू, मृत्यूपूर्वी व्हिडिओत पोलिसांवर गंभीर आरोप

घटना घडताच बघ्यांची मोठी गर्दी होती. दरम्यान, फिर्यादी महिला व आरोपीचे सात वर्षांपूर्वी लग्न झालेले आहे. मात्र नेहमीच्या घरगुती भांडणामुळे फिर्यादी महिला पतीपासून गेल्या वर्षभरापासून माहेरी जालना येथे राहत आहे. गावाकडील भांडणात दोघांची साक्ष असल्याने पती- पत्नी न्यायालयात आले होते. साक्ष देऊन बाहेर येताच ही घटना घडली, अशी माहिती शहर पोलिसांनी दिली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन रात्री शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या; मिक्सरच्या वायरने गळा आवळून पती थेट पोलीस ठाण्यात

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या

चारित्र्याच्या संशयातून एका विवाहित महिलेची तिच्याच पतीने निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. मिक्सरच्या वायरने गळा आवळून पत्नीची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर पती स्वतः चाकण पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना चाकणमध्ये घडली आहे. बडीमा रफिक पठाण (वय २७, रा. चाकण) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मृत्यू झालेल्या महिलेचा पती म्हणजेच आरोपीचे नाव रफिक पठाण (वय ३२, व्यवसाय गवंडी, रा. चाकण) असे आहे.

Web Title: An incident occurred where a husband attempted to set his wife on fire at the court gate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • Arrested News
  • Sillod Crime
  • sillod news

संबंधित बातम्या

नसरापूरनंतर मावळ हादरलं! टाकवे बुद्रुकमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; 51 वर्षीय आरोपीला अटक
1

नसरापूरनंतर मावळ हादरलं! टाकवे बुद्रुकमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; 51 वर्षीय आरोपीला अटक

टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात
2

टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात

दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद
3

दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा; सहा वर्षांच्या मुलाची साक्ष ठरली निर्णायक
4

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा; सहा वर्षांच्या मुलाची साक्ष ठरली निर्णायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.