काय घडलं नेमकं?
बडीमा रफिक पठाण (वय २७, रा. चाकण) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मृत्यू झालेल्या महिलेचा पती म्हणजेच आरोपीचे नाव रफिक पठाण (वय ३२, व्यवसाय गवंडी, रा. चाकण) असे आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.आरोपीला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळेच दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. झालेल्या वादाचे पर्यवसान अत्यंत भीषण घटनेत झाले. संतापाच्या भरात आरोपीने घरातील मिक्सरच्या वायरने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली.
हत्येनंतर आरोपी फरार न होता थेट चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गेला. तिथे हत्येची कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृयूतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेमुळे चाकण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी मृत महिलेचे वडील मकबूल नदाफ (वय ५५, रा. चाकण) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत असून सखोल चौकशी करत आहे.
Pune Sucide News : पुण्यात गॅलरीतून उडी मारून मुलीची आत्महत्या; घरातील सर्वजण झोपले अन्…
राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. इमारतीच्या पाचव्या माजल्यावरून उडी मारून एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना धनकवडी येथील निर्मल पार्क सोसायटीत गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रिद्धी रवी केडिया (वय १७, रा. निर्मल पार्क सोसायटी, चव्हाण नगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
Ans: चारित्र्याच्या संशयातून.
Ans: मिक्सरच्या वायरने गळा आवळून.
Ans: स्वतः चाकण उत्तर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची माहिती दिली.






