काँग्रेस आमदाराच्या घरी EDची छापेमारी; कोट्यवधींच घबाड जप्त
ED Raid on Congress MLA: बेंगळुरूतील झोनल ऑफिसच्या ईडी टीमने कर्नाटकातील कारवार, गोवा, मुंबई आणि दिल्ली येथे एकाच वेळी छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकातील कारवार विधानसभा मतदारसंघाचे आमदार सतीश कृष्ण सैल उर्फ सतीश सैल आणि त्यांच्याशी संबंधित अनेक व्यावसायिक आणि कंपन्यांमध्ये ही छापेमारी करण्यात आली. ईडीने सतीश सैल यांच्या घरातून ईडीने १.४१ कोटींची रोख रक्कम जप्त केली आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबियांच्या बँक लॉकरमधून ६.७५ किलोचे सोने आणि इतर दागिनेही जप्त केले आहेत.
याशिवाय आमदार सतीश कृष्ण सैल उर्फ सतीश सैल आणि त्यांच्याशी संबंधित अनेक व्यावसायिक आणि कंपन्यांमध्ये ही छापेमारी करण्यात आली. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत सतीश सैल यांच्या आशापुरा माइनकेम लिमिटेड, श्री लाल महाल लिमिटेड, स्वस्तिक स्टील्स (हॉस्पेट) प्रायव्हेट लिमिटेड, आयएलसी इंडस्ट्रीज लिमिटेड आणि श्री लक्ष्मी वेंकटेश्वर मिनरल्स लिमिटेड या कंपन्यांवरही छापेमारी करण्यात आली आहे.. बेंगळुरूच्या खासदार-आमदार विशेष न्यायालयाने या कंपन्यांना बेकायदेशीर लोहखनिज निर्यातीच्या प्रकरणात आधीच दोषी ठरवण्यात आले होते. त्या प्रकरणी त्यांना सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षाही सुनावण्यात आली होती.
सर्वसामान्यांना आता मोठा फटका बसणार; ऑगस्टमध्ये महागाईवाढीचा अंदाज, ‘या’ बाबी ठरणार कारणीभूत
मल्लिकार्जुन शिपिंग ही सैल यांची कंपनी असल्याचे सांगितले जात आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी आमदाराला दिलेली सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा निलंबित करण्याचा आदेश दिला होता. एजन्सीने आरोप केला आहे की, ईडीच्या तपासात असे आढळले की, सैल यांनी इतर व्यावसायिक संस्था आणि बेलेकेरी बंदरातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून 19 एप्रिल 2010 ते 10 जून 2010 या कालावधीत सुमारे 1.25 लाख मेट्रिक टन लोहखनिज पावडरची बेकायदेशीर निर्यात केली होती.
ईडीने सतीश सैल घरातून १.४१ कोटी रुपये रोख जप्त केले आहेत. यासोबतच श्री लाल महाल लिमिटेडच्या कार्यालयातून २७ लाख रुपये रोख सापडले आहेत. साईल कुटुंबाच्या बँक लॉकरमधून ६.७५ किलो सोने (दागिने आणि बिस्किटांच्या स्वरूपात) जप्त करण्यात आले आहे. इतकेच नाही तर सतीश साईल आणि त्यांच्या कंपन्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केलेले १४.१३ कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत आणि अनेक महत्त्वाचे कागदपत्रे, ईमेल आणि रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहेत.
World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत… मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!
दुसरीकडे, ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म परिमॅच प्रकरणात गुरुवारी तपास यंत्रणेने मोठी माहिती दिली. सायप्रसस्थित बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म परिमॅचविरुद्ध छापा टाकल्यानंतर ईडीने सांगितले. संशयास्पद बँक खात्यांमधील ११० कोटी रुपयांचे व्यवहार थांबवण्यात आले आहेत. यासोबतच १ हजार २०० क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आले आहेत.