Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 लाखाची लाच स्वीकारणं भोवलं; बारामतीच्या नगररचनाकाराला रंगेहात पकडले

एक लाख रुपये रकमेची लाच स्वीकारताना बारामती नगर परिषदेचे नगररचनाकार विकास किसनराव ढेकळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 20, 2025 | 02:59 PM
1 लाखाची लाच स्वीकारणं भोवलं; बारामतीच्या नगररचनाकाराला रंगेहात पकडले
Follow Us
Close
Follow Us:

बारामती : बारामती शहरातील बांधकाम व्यवसायाकडून गृह प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाचेची मागणी करून त्यातील एक लाख रुपये रकमेची लाच स्वीकारताना बारामती नगर परिषदेचे नगररचनाकार विकास किसनराव ढेकळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे. या कारवाईमुळे बारामती शहरात खळबळ उडाली आहे.

बारामती शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील रुई याठिकाणी निर्मिती विहार इमारत बी विंग १, या गृह प्रकल्पाचा प्रस्ताव बारामती नगर परिषदेच्या नगररचना विभागाकडे मंजुरीसाठी दाखल केलेला आहे. सदर प्रस्ताव मंजुरीसाठी नगररचनाकार विकास ढेकळे यांनी तक्रारदारांना दोन लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार १९ मार्च २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने केली. दरम्यान तडजोडीअंती १ लाख ७५ हजार रुपयांची मागणी नगर रचनाकार ढेकळे यांनी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर या विभागाने तक्रारीची पडताळणी केली, त्यानुसार तक्रारदाराने १ लाख ७५ हजार रुपये रकमेपैकी १ लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले.

सदर रक्कम ढेकळे यांनी बारामती शहरातील ऑक्सिजन जिम या ठिकाणी दिनांक १९ मार्च रोजी देण्यासाठी तक्रारदाराला बोलावले. यादरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल भोसले, पोलीस हवालदार किरण चिमटे, महिला पोलिस शिपाई कोमल शेटे, चालक पोलिस शिपाई दीपक दिवेकर आदींच्या पथकाने सापळा लावला.

दिनांक १९ रोजी रात्री आठ वाजता बारामती शहरातील ऑक्सिजन जिम याठिकाणी १ लाख रुपयांची लाच नगररचनाकार ढेकळे यांनी तक्रारदार बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून स्वीकारली, यावेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून ढेकळे यांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातील १ लाख रुपये व मोबाईल जप्त केला. बारामती शहर पोलिस ठाण्यात आरोपी विकास ढेकळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Baramati town planner arrested for taking bribe nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • Arrested
  • Baramati Crime
  • Baramati Police
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

पुण्यात चोरांचा धुमाकूळ! ‘या’ भागात घरे फोडून लाखो रुपयांवर मारला डल्ला
1

पुण्यात चोरांचा धुमाकूळ! ‘या’ भागात घरे फोडून लाखो रुपयांवर मारला डल्ला

Mira Bhayander : भाईंदर पोलीस ठाण्यातील शिपाईची आत्महत्या ; पोलिस आयुक्तालयात एकच खळबळ
2

Mira Bhayander : भाईंदर पोलीस ठाण्यातील शिपाईची आत्महत्या ; पोलिस आयुक्तालयात एकच खळबळ

पिंपरीतील व्यावसायिकावरील गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
3

पिंपरीतील व्यावसायिकावरील गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

उत्तम जाधव खूनप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी टोळीप्रमुखासह 12 जणांवर थेट…
4

उत्तम जाधव खूनप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी टोळीप्रमुखासह 12 जणांवर थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.