बाबा सिद्दिकी हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर राजकीय आणि सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. काल रात्री (दि.12) मुलाच्या झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हल्ला करण्यात आला. तीन हल्लेखोरांनी त्यांच्या तीन चार राऊंड फायर केले. त्यांच्या छातीवर गोळी लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. निर्मल नगर परिसरामध्ये हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आल्या आहेत. या घटनेचा सखोल तपास पोलिसांनी सुरु केला आहे. दरम्यान बाबा सिद्दिकी हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे एका बड्या गँगस्टरचा हात असल्याचा पोलिसांना आधीपासून संशय होता. यामागे सलमान खान गोळीबार कनेक्शन असून बिश्नोई गँगचा त्यामागे हात असल्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने आता बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत लॉरेन्स बिश्नोई गॅन्गने ही जबाबदारी घेतली आहे.
हे देखील वाचा : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरून सरकारला घरचा आहेर! छगन भुजबळ यांनी सुनावले खडेबोल
मीडिया रिपोर्टनुसार, बिश्नोई टोळीच्या फेसबुक पोस्टमध्ये “ओम जय श्री राम, जय भारत” असे म्हटले आहे. या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “मला जीवनाचे सार समजते, मी शरीर आणि संपत्तीला धूळ समजतो. मी फक्त एक चांगले काम केले ते म्हणजे मैत्रीचे कर्तव्य. सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होते. पण तू, आमचा भाऊ (लॉरेन्स) एकेकाळी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या बिश्नोईचे बॉलिवूड आणि प्रॉपर्टी डीलिंगशी संबंध होते.
या व्यतिरिक्त अनुज थापनचे नाव देखील पोस्टमध्ये आहे, ज्याने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता आणि पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू त्यांचा बदला असल्याचे टोळीचे म्हणणे आहे. यामुळे आता राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.