काय घडलं नेमकं?
एका खासगी परीक्षा केंद्रावर ही विद्यार्थिनी पेपर देण्यासाठी आली होती. परीक्षा सुरु असतानाच तिच्या पोटात अचानक तीव्र कळा सुरु झाल्या. ती तातडीने स्वच्छतागृहात गेली, तिथे तिने एका बाळाला जन्म दिला. परीक्षा केंद्र संचालकांना या प्रकारची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले. रुग्णवाहिका पोहोचताच विद्यार्थिनी आणि नवजात बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्याथीनी आणि नवजात बाळ या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. ते डॉक्टरांच्या देखरेखेखाली आहेत.
हॉटेल बिलावरून झाला राडा; एकावर कुऱ्हाडसह लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला
धक्कदायक माहिती समोर?
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पीडित मुलीची विचारपूस केली. यावेळी तिने धक्कादायक माहिती दिली. तिने म्हंटले की गेल्या दोन वर्षांपासून बेटमा येथील जीवन ज्योती कॉलनीतील ‘कान्हा’ नावाचा तरुण तिच्या संपर्कात होता. लग्नाचे आमिष दाखवून आणि धाक दाखवून तो तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करत होता. या छळातून तिला गर्भधारणा झाली होती असे तिने सांगितले.
कठोर कारवाईचे आश्वासन
पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध सुरु केला आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात असून आरोपीला लवकरच अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!
मध्यप्रदेश येथे एक भयंकर घटना घडल्याचे समोर आले आहे. माणुसकीला काळिमा फासणारी आणि देशाला हादरवून टाकणारी ही घटना आहे. एका प्रियकराने आधी आपल्या प्रेयसीची हत्या केली. त्यांनतर तिच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार केला. त्याने बदला घेण्यासाठी काही खासगी फोटो देखील व्हायरल केले. एवढेच नाही तर प्रेयसीची आत्मा बोलावण्यासाठी त्याने अघोरी कृत्य देखील केल्याचे समोर आले आहे. ही घटना एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटालाही मागे टाकेल. पोलिसांनी आरोपीला मुंबईतून अटक केली आहे.
Asaam Crime: आसाम हादरले! प्रियकरासमोर 28 वर्षीय तरुणीवर सात जणांकडून अत्याचार; एवढेच नाही तर…
Ans: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार झाल्याचा आरोप.
Ans: संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Ans: दोघांचीही प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.






