फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; आरोपी प्रशांत बनकरला ४ दिवसांची पोलीस कोठडी
साताऱ्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर याला सातारा जिल्हा न्यायालयात हजर कऱण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. २८ ऑक्टोबरपर्यंत तो पोलिस कोठडीत असेल.
दोन दिवसांपूर्वी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी आज पहाटेच्या सुमारास सातारा पोलिसांनी पुण्यातून प्रशांत बनकरला अटक करण्यात आली. फलटण पोलिसांनी या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक आणि प्रशांत बनकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. घटनेनंतर दोघेही फरार होते, मात्र अखेर प्रशांत बनकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पण दुसरा आरोपी गोपाळ बदने अद्यापही फरार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याचे शेवटचे लोकशन पंढरपूर येथील आहे.
इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले अन्…
आरोपी पीएसआय आणि प्रशांत बनकर यांच्या अटकेनंतर, तपास पथक आता सर्व पुरावे, व्हिडिओ फुटेज आणि वैद्यकीय पुरावे गोळा करत आहे. जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही असे पोलिसांनी म्हटले आहे.
डॉक्टर मराठवाडा भागातील बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्याची रहिवासी होती आणि फलटण येथे तैनात होती. एका वृत्तवाहिनीशी बोलताना, मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत. ‘ डॉक्टर महिलेने मृत्यूपूर्वी अनेक वेळा छळाची तक्रार केली होती, परंतु तिच्या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही.
पोलिसांनी आम्हाला आत्महत्या माहिती दिली आणि आम्ही रुग्णालयात गेलो. डॉक्टर म्हणून मी त्यांना सांगितले की मी पोस्टमार्टमला उपस्थित राहीन. तेव्हाच मी तिच्या तळहातावर सुसाईड नोट पाहिली आणि पोलिसांना कळवले. फॉरेन्सिक तज्ञांनी पोस्टमार्टम करावे असे मी सुचवले.”
डॉक्टर महिला ज्या रुग्णालयात काम करते त्या रुग्णालयात वैद्यकीय अहवाल बदलण्यासाठी तिच्यावर राजकीय आणि रुग्णालयातील वरिष्ठांनीच दबाव आणला होता. फलटणमधील राजकीय लोक तिला अनेकदा वैद्यकीय अहवाल बदलण्यासाठी दबाव टाकत होते. कारण ती नियमितपणे पोस्टमार्टम ड्युटीवर होती. तिने अनेक वेळा सब-इन्स्पेक्टरविरुद्ध तक्रार केली होती, परंतु तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले.
“एका वैद्यकीय अधिकाऱ्या कडूनही महिला डॉक्टरला वारंवार त्रास दिला जात होता त्यांनी वारंवार तिच्यावर शवविच्छेदनाची जबाबदारी सोपवली. आरोपींना अटक करणे पुरेसे नाही. डॉक्टर आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून त्यांना फाशी देण्यात यावी. डॉक्टरला मानसिक त्रास दिल्याचा आरोप असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रशांत बनकरला शनिवारी पुण्यात अटक करण्यात आली.






