संग्रहित फोटो
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुण एमआयडीसी परिसरात वास्तव्यास आहे. त्याने एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान इंस्टाग्रामद्वारे मुलीशी सतत संपर्क ठेवत तिला चॉकलेट्स व विविध भेटवस्तू देऊन तिचा विश्वास संपादन केला. फक्त १३ वर्षांची असलेल्या या अल्पवयीन मुलीला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत शरीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबाने धैर्य दाखवत थेट पोलिसांकडे धाव घेतली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसंदर्भात पालकांनी अधिक जागरूक राहावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
हरियाणातील नात्याला काळिमा फासणारी घटना
हरियाणाच्या फरीदाबादमधून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली. पत्नी घर सोडून गेल्यानंतर वडील दररोज रात्री स्वत:च्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करत असल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी आजारी पडल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातील बल्लभगड येथे एका ४२ वर्षीय ऑटो-रिक्षा चालकाने स्वत:च्या १४ वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याबद्दल अटक केली आहे. आरोपी वडिलांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून एक वडील आपल्या १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करत होता.






