बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हॉटेलमध्ये तरुण व तरुणीचा मृतदेह बंद खोलीत आढळून आला आले आहे.
ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बाह्यवळण परिसरात असलेल्या हॉटेल जुगनू येथे घडली आहे. हॉटेलमध्ये मृतक दुपारपासून थांबलेले असल्याची माहिती देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराने आधी प्रेयसीची हत्या केली व नंतर स्वतःलाही भोसकून घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठा जमाव जमला होता. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
नेमकं काय घडलं?
मृतकाचे नाव सोनू राजपूत व पायल पवार असे आहे. हे दोघेही साखरखेर्डा गावातील रहिवासी होते. हॉटेल जुगनूमध्ये या दोघांनी मंगळवारी सायंकाळी रम भाड्याने घेतली. या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि प्रियकराने प्रेयसीची भोसकून हत्या केली. त्यानंतर स्वतःवर देखील चाकूने सपासप वार करत संपवलं. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही तीन ते चार वर्षापासून प्रेम संबंधात होते. याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. यावेळी खामगाव शहरात माहिती पसरताच मोठा जमाव या हॉटेल परिसरात जमला होता. यावेळी पोलिसांनी गर्दीवर मिळवण्यासाठी सौम्य बळाचा वापरही करावा लागला होता.
चारित्र्याच्या संशयावरून केली हत्या
सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार, ही हत्या आणि आत्महत्या चारित्र्यच्या संशयावरून करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये २१ वर्षीय युवती व सोनू उर्फ साहिल राजपूत (२३, दोघेही रा. साखरखेर्डा) यांचा समावेश आहे. काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यातूनच साहिलने हॉटेलात युवतीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा खून केला. त्यानंतर स्वतःवर वार करत त्याने जीवन संपवलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
तपास सुरु
घटनेची माहिती मिळताच हॉटेलमध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. . दरम्यान, एसआरपीचे पथकही घटनास्थळी दाखल होऊन सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. मृतदेहाचा पंचनामा करून त्यांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. या हत्येमागचं नेमकं कारण काय? याच तपास पोलीस करत आहे.