
baramati accident
संगीता प्रदीप लोंढे (वय ३८) आणि मनिषा बबन शिंदे (वय ४३, दोघी रा. पिंपरद) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. गुरुवारी (दि. २७) दुपारी सव्वा एकच्या सुमारास त्या दुचाकीवरून एमआयडीसी परिसरातून जात असताना एमएच-४२, बीके-०७०७ क्रमांकाच्या भरधाव मोटारीने त्यांच्या एमएच-१४, १५३१ क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचे अक्षरशः तुकडे झाले. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले, तर दुचाकीवरील दोन्ही महिला गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळल्या.
अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. क्षणाचाही विलंब न करता जखमी महिलांना उपचारासाठी बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघींनाही मृत घोषित केले. उपचारासाठी आणलेल्या दोन्ही महिलांना डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे समजताच नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मोटारीचा वेग अधिक असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. भरधाव वेगाने आलेल्या मोटारीच्या धडकेत दुचाकीचा चक्काचूर झाल्याने अपघाताची भीषणता स्पष्ट झाली. दरम्यान, या घटनेने पिंपरद परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दोन महिलांच्या अचानक झालेल्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांचा आधार हिरावला गेला आहे. नेहमीप्रमाणे आपल्या कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या या दोन्ही महिला पुन्हा घरी परतल्याच नाहीत, या विचाराने नातेवाईक व ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
हिसर टोल नाक्याजवळ गोदावरी लॉजसमोर सोमवारी दुपारी सुमारे एकच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. सौरभ विश्वकर्मा असे मृत मुलाचे नाव असून, तो आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून शाळेतून घरी जात असताना मागून आलेल्या भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत सौरभच्या वडिलांनाही दुखापत झाली आहे.