नुकतचं केंद्र सरकारने बेकायदेशीर बेटिंग ॲप महादेवसह 22 बेटिंग सॉफ्टवेअर आणि वेबसाइट ब्लॉक (Mahadev Betting App Ban) केल्या आहेत. ईडीच्या (ED) कारवाईनंतर केंद्र सरकारने ही कारवाई केली. आता महादेव बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्यासह 31 जणांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 2019 पासून आतापर्यंत या ॲपच्या माध्यमातून सुमारे 15000 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी उघड केले आहे.
[read_also content=”रेव्ह पार्टी प्रकरणी एल्विश यादव नोएडा पोलिसांसमोर हजर, तीन तास झाली चौकशी! https://www.navarashtra.com/latest-news/elvish-yadav-noida-police-arrested-investigation-took-three-hours-478758.html”]
इंडियी ट्विव्हीच्या वृत्तानुसार, फसवणुकीच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी चंद्राकरविरुद्ध आयपीसीच्या कलम ४२०, ४६५, ४६८, १२० (बी) आणि आयटी कायद्याच्या कलम ६६ (सी), ६६ (एफ) अन्वये एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चंद्राकरसह एकूण 32 जणांना आरोपी केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी IT चे कलम 66 (F) लागू केले आहे, याचा अर्थ “सायबर दहशतवादासाठी शिक्षा” असा आहे. हे कलम फार कमी प्रकरणांमध्ये लागू केले जाते. विशेषत: भारताची अखंडता, एकता आणि सुरक्षा धोक्यात असलेल्या अशा प्रकरणांमध्ये हे कलम लागू केले जाते.
तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, 2019 पासून आतापर्यंत आरोपी फेसबुक, इंस्टाग्राम, गुगलवर जाहिराती देत होते आणि खिलाडी बुक सारख्या ऍप्लिकेशन्सचा वापर करून लोकांना क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, कॅसिनो, तीन पत्ती सारखे खेळ खेळण्यास भाग पाडत होते. आरोपींनी या माध्यमातून अंदाजे 15,000 कोटी रुपये कमावले असून या पैशाचा वापर करून ते देश-विदेशातील हॉटेल्स आणि इतर मालमत्ता खरेदी करत आहेत आणि हा पैसा गुंतवत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MEITY) नुकतेच महादेव ॲपसह 22 बेकायदेशीर बेटिंग अॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे आदेश जारी केले आहेत. ईडीच्या विनंतीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, वेबसाइट ब्लॉक होताच महादेव बुकने नवीन डोमेनही जारी केले. सट्टेबाजी करणार्यांचा आयडी आणि पासवर्ड सारखाच राहणार असल्याचे अॅपने जाहीर केले होते.