आधी घेतला आशिर्वाद अन् मारला डल्ला; भक्तच बनला चोर, Video तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका चोर चंद्रिका देवीच्या मंदिरात शिरला आहे. मंदिरात देवीच्या गाभाऱ्यात शिरल्यानंतर या चोराने देवीच्या पाया पडून मग तिचे दागिने चोरले आहे. हे दृश्य पाहून अनेकजण हैराण झाले आहे. मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेरात हे दृश्य कैद झाले आहे. या चोराने मंदिरातील दानपेटीतूनही पैसे चोरले असल्याची माहिती समोर आली आहे. हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशाच्या उन्नाव येथील असल्याचा दावा केला जात आहे. दोन संशयास्पद लोकांनी चंद्रिका देवीच्या मंदिरात चोरी केली आहे. परंतु चोरी करण्यापूर्वी चोरांनी देवीच्या पाया पडले आहेत. नंतर दागिने आणि दानपेटीतील पैसे घेऊन दोन्ही चोर आरामात फरार झाले आहेत.
व्हायरल व्हिडिओ
उन्नाव के प्रसिद्ध चंद्रिका देवी धाम में एक हैरान करने वाली चोरी हुई है, जहाँ चोरों ने मां दुर्गा के मुकुट और दान पेटी को चुरा लिया; इस घटना का CCTV फुटेज सामने आया है, जिसमें चोरों को आसानी से मंदिर से कीमती सामान लेकर भागते देखा जा सकता है, पुलिस जांच में जुटी है. pic.twitter.com/btK0vIf41n — Uttam Hindu (@DailyUttamHindu) January 7, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @DailyUttamHindu या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, वा! काय चोर आहे. असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने भावाने चोरीपण अत्यंत प्रामाणिकपणे केली असे म्हटले आहे. तर आणखी एकाने या चोराला पोलिसांच्या ताब्यात द्या, तिथे त्याला चांगला प्रसाद मिळेल असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






