पोलिसाला लाच घेताना अटक (फोटो- istockphoto)
लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकाला अटक
तक्रारादराने केली होती एसीबीकडे तक्रार
25 हजारांच्या लाचेची केलेली मागणी
चिपळूण:चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील पोलीस उपनिरीक्षकाच्या सांगण्यावरून लाच स्वीकारत असताना त्यांच्या सहकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. सावर्डे पोलिस स्टेशन येथे मयताच्या वारसदारांना विमा रक्कम मिळविण्यासाठी क्लेम ट्रिब्युनल कोर्टात दावा दाखल करावायचा होता. त्यासाठी अपघातातील वाहनाचा आरटीओ तपासणी अहवाल व डीओआर फॉर्म देण्याकरिता पोलिस उपनिरीक्षक मनिष कांबळे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदाराने दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली. तक्रारीच्या अनुषंगाने पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता तडजोडीअंती १५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे ठरले, ही लाच रक्कम थेट न घेता, खासगी इसम अभिजित प्रकाश शिर्के (रा. चिपळूण) याच्यामार्फत स्वीकारण्याचे मनिष कांबळे बांनी तक्रारदाराला फोनद्वारे सांगितले.
विकृतीची परिसीमा! 11 वर्षांची मुलगी शाळा सुटल्यावर…; नेमके घडले काय? आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
त्यानुसार तक्रारदार चिपळूण पोलीस स्टेशनजवळील सोमेश्वर जनरल स्टोअर्स या दुकानात गेला. तेथे अभिजित शिके यांनी फोनद्वारे मनिष कांचले यांच्याशी संपर्क साधला. दोघांमध्ये संभाषण झाल्यानंतर शिर्के यांनी तक्रारदाराकडून पंचर्चासमक्ष १५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. सदर लाच रक्कम लोकसेवकाच्या सांगण्यावरून व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याने खासगी व्यक्ती अभिजित शिर्के याला पंचांसमक्ष लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
लांजा येथे ११ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करणान्या नराधमाला रत्नागिरी सत्र न्यायालयाने जन्मठेप व २२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठालाली. आशिष अनिल जाधव(प २०, लांजा असे आरोपीचे नाव आहे १५ जुलै २०२३ रोजी येथे अत्याचाराची संतापजनक घटना घडली होती. याप्रकरणी लांजा पोलिसांकडून आशिष याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंचाळकर यांनी या खटल्याचा निकाल दिला.
‘अल्पवयीन मुलीला आंब्याच्या बागेत नेले अन्…’; कोर्टाने आरोपीला सुनावला 20 वर्षांच्या सश्रम कारावास
सरकार पक्षाकडून अॅड. अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले, मुद्यातील माहितीनुसार १५ जुलै २०२३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पीडिता शाळेतून सुटल्यानंतर घरी चालत जात होती. यावेळी तिच्यासोबत शाळेतील दोन मुलं होती. यावेळी आसितोष हा पीडितेजवळ आला, त्याने तिच्यासोबत असलेल्या दोना मुलांना धमकावून वेगळ्या रस्त्याने ती जाण्यास सांगितले, घाबरलेली दीन्ही मुले वेगळ्या रसस्थाने घरी जाण्यास निघाली.






