चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कालव्यात पडलेल्या नातवाला वाचवतांना आजोबाही वाहून गेल्याची दुःखद घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडल्यासाधे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हिरापूर येथील घटना आहे. रोहित गोरंतवार आणि भगवानदास लाटेलवार असे वाहून गेलेल्या नातू आणि आजोबाच नाव आहे. शनिवारी हे दोघे बकऱ्यांचा चारा आणण्यासाठी आसोलामेंढा तलावाच्या परिसरात गेले होते. झाडावर चढून पाला तोडताना नातवाचा तोल गेला आणि तो आसोलामेंढाच्या कालव्यात पडला. हे पाहताच आजोबाने नातवाला वाचवण्यासाठी कालव्यात उडी घेतली मात्र पाण्याच्या प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले. सध्या या दोघांचाही शोध सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कालव्यात उडी घेतली मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले. सध्या या दोघांचाही शोध सुरू असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
NEET 99.99% टॉपर, MBBS प्रवेशापूर्वीच १९ वर्षीय विद्यार्थ्याने घेतला गळफास; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मृतक हा नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. तो प्रवेशासाठी जाण्याच्या काही तासाआधीच गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मृतकाचे नाव अनुराग अनिल बोरकर असे आहे. अनुराग हा नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. तरीही त्याने आत्महत्येचं पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सुसाइड नोटमध्ये काय?
अनुरागला डॉक्टर व्हायचे नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. 19 वर्षीय अनुराग बोरकर याने नीट परीक्षेत यश मिळवलं होतं. त्याने सुसाइड नोटमध्ये डॉक्टर व्हायचं नसल्याचं सांगितलं आहे.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला होता. तो आज, 24 सप्टेंबरला एमबीबीएस प्रवेशासाठी गोरखपूर येथे जाणार होता. त्यापूर्वीच त्याने आपलं जीवन संपवलं. त्याने आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. मृतक अनुराग बोरकर याने NEET UG 2025 परीक्षेत 99.99 टक्के गुण मिळवून ओबीसी प्रवर्गातून 1475 वी रँक पटकाविली होती. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास नवरगाव पोलीस करीत आहे.