पोटात सडणारे शौच बाहेर काढून टाकण्यासाठी उपाशी पोटी करा 'या' बारीक दाण्यांच्या पाण्याचे सेवन
रोजच्या आहारात काहींना सतत तिखट आणि तेलकट पदार्थ खाण्याची सवय असते. पण वारंवार तिखट पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचते. ऍसिडिटी आणि पोटात बद्धकोष्ठता वाढते. शरीरात साचून राहिलेली विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे आरोग्य बिघडते आणि वारंवार आंबट ढेकर येणे. उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. सकाळी उठल्यानंत आतड्यांमधील घाण बाहेर पडून गेली नाहीतर संपूर्ण दिवस खराब जातो. बऱ्याचदा ऍसिडिटी किंवा पित्ताची समस्या वाढल्यानंतर मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण वारंवार गोळ्या खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात कोणत्या बारीक दाण्यांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थाच्या सेवनामुळे आरोग्य सुधारेल.(फोटो सौजन्य – istock)
मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. नियमित सकाळी उठल्यानंतर मेथी दाण्यांचे पाणी प्यायल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाते. यामुळे अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होतात, पोट फुगत नाही, पोटात वाढलेला जडपणा कमी होतो, मेटाबॉलिझम सक्रिय राहते इत्यादी अनेक फायदेस शरीराला होतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी इतर कोणत्याही पेयांचे सेवन करण्याऐवजी मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. यामुळे शरीराला आतून ऊर्जा मिळते आणि पचनक्रिया सुधारते.
रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथी दाण्यांचे पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरसुद्धा देतात. मेथी दाण्यांचे पाणी प्यायल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. यामुळे शरीर रक्तातील साखर स्थिर ठेवते. इंसुलिनचे कार्य सुधारण्यासाठी मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर फायबर आढळून येते. याशिवाय पोटातील जडपणा कमी होतो.
सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे आतड्यांमध्ये विषारी घटक आणि गॅस साचून राहतो. यामुळे शरीराला हानी पोहचते. पोटात साचून राहिलेल्या विषारी वायूमुळे पोटात गॅस तयार होतो. विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मेथी दाण्याचे पाणी प्यावे. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेला कडक मल बाहेर पडून जातो आणि शरीर स्वच्छ होते. मेथी दाण्यांच्या पाण्यामुळे ऍसिडीमुळे वाढलेली जळजळ कमी होते.
Eye Care: दिवाळीमध्ये डोळ्यांची काळजी घ्या, सुरक्षित राहा; सुरक्षेसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला
पचनक्रियेत कोणती अवयव एकत्र काम करतात?
पचनसंस्थेतील अनेक अवयव एकत्र काम करतात. यामध्ये तोंडापासून गुदद्वारापर्यंतच्या सर्व पाचक ग्रंथींचा समावेश आहे, ज्या पाचक रस तयार करतात.
सामान्य पचनाच्या समस्या:
पोटदुखी, उलट्या होणे, मळमळणे आणि आतडे मोकळे होणे या काही सामान्य पचनाच्या समस्या आहेत. छातीत जळजळ, पित्ताशयातील खडे, चिडचिडे आतड्यांसंबंधी सिंड्रोम आणि मूळव्याध यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.