Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुटुंबियांनी प्रेमाला विरोध केल्याने प्रेमीयुगुलाने घेतला टोकाचा निर्णय; विष प्राशन केले अन्…

विशालच्या मृत्यूची वार्ता समजताच त्याचे नातेवाईक आणि रिक्षाचालक मित्र रुग्णालयात धावले. त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांना दोष देत संताप व्यक्त केला. यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 18, 2026 | 08:01 AM
कुटुंबियांनी प्रेमाला विरोध केल्याने प्रेमीयुगुलाने घेतला टोकाचा निर्णय; विष प्राशन केले अन्...

कुटुंबियांनी प्रेमाला विरोध केल्याने प्रेमीयुगुलाने घेतला टोकाचा निर्णय; विष प्राशन केले अन्...

Follow Us
Follow Us:

नागपूर : चार वर्षे एकमेकांच्या साथीने भविष्यातील संसाराची स्वप्ने रंगवणाऱ्या प्रेमीयुगुलाच्या आयुष्याला अखेर दुर्दैवी वळण मिळाले. एकत्र जगण्याची इच्छा होती. मात्र, कुटुंबीयांच्या विरोधामुळे ते स्वप्न अपुरेच राहिले. निराश झालेल्या दोघांनी विष प्राशन करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. यात प्रियकर विशाल विलास जवादे (वय २१, रा. वानाडोंगरी) याचा उपचारादरम्यान मृत्यू तर २० वर्षीय प्रेयसी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हा हंगामात मंडप सजावटीचे काम करत असे तर इतर वेळी ऑटो चालवून कुटुंबाला हातभार लावत होता. त्याचे त्याच परिसरात राहणाऱ्या तरुणीवर प्रेम होते. चार वर्षे दोघांचे प्रेमसंबंध होते आणि आता त्यांना विवाह करून आयुष्याची नवी सुरुवात करायची होती. दोघांनीही कुटुंबीयांसमोर विवाहाची इच्छा व्यक्त केली. मात्र, दोन्ही बाजूंनी नात्याला विरोध झाला. रविवारी झालेल्या चर्चेतही कोणताही तोडगा निघाला नाही. उलट वाद वाढल्याने दोघांचीही निराशा अधिकच गडद झाली.

Mahadev Betting App Case : टीव्ही होस्ट शेफाली बग्गाची इडी करणार चाैकशी, अवैध सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप

दरम्यान, दोघेही संगम गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या मोकळ्या मैदानात गेले. सोबत आणलेले विष त्यांनी प्राशन केले. काही वेळातच विशालची प्रकृती बिघडू लागली आणि तो जमिनीवर कोसळला. तेथून जाणाऱ्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत दोघांनाही तत्काळ शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही रात्री विशालची प्राणज्योत मालवली. प्रेयसीवर अद्याप उपचार सुरू आहे.

नातेवाईकांची रुग्णालयात धाव

विशालच्या मृत्यूची वार्ता समजताच त्याचे नातेवाईक आणि रिक्षाचालक मित्र रुग्णालयात धावले. त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांना दोष देत संताप व्यक्त केला. यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती लक्षात घेऊन एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत कोकणी यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोकुळ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Couple commits suicide over a love affair incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 08:01 AM

Topics:  

  • crime news
  • Nagpur News
  • Suicide case

संबंधित बातम्या

गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई
1

गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई

अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर…; पुण्यातील प्रकार
2

अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर…; पुण्यातील प्रकार

Nagpur News :भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल
3

Nagpur News :भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल

Nagpur News : धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर सज्ज ;पाच दिवस वाहतुकीचे विशेष नियोजन
4

Nagpur News : धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर सज्ज ;पाच दिवस वाहतुकीचे विशेष नियोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.