(फोटो सौजन्य: Pinterest)
ईडीले लाावले गंभीर आरोप
तपासामध्ये ईडीच्या हातात अनेक डिजिटल पुरावे आणि प्रमोशनल पेज लागले आहेत ज्यात शेफाली बग्गा कथितरित्या बेटिंग ॲपचा प्रचार करताना दिसली. तपास यंत्रणांचा दावा आहे की, तिने फक्त या ॲपचा प्रचार केला नाही तर खेळाडूंना सट्टेबाजीच्या टिप्सही दिल्या. ईडीने सांगितले की, शेफाली बग्गाचे एक टेलिग्राम चॅनेल देखील आहे जिथे ती कथितरित्या बेटिंग ॲप्सचे प्रमोशन आणि बेटिंगशी जोडलेल्या टिप्स शेअर करते. या प्रमोशनच्या बदल्यात शेफाली बग्गाला काही आर्थिक मदत दिली जात होती का याचा तपास आता ईडी करत आहे. याचबरोबर या पूर्ण नेटवर्कमध्ये तिची भूमिका काय होती याचाही तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात ईडीने विकास गर्गला अटक केली आहे. आता शेफाली बग्गाच्या चाैकशीच्या आधारे, महादेव ऑनलाइन बेटिंग नेटवर्क, हवाला व्यवहार आणि यात सामील असलेल्या अन्य लोकांच्या भूमिकेचा तपास ईडी करणार आहे. सध्या या प्रकरणात ईडीचा तपास सुरु असून चाैकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.
ईडीने करोडोंची संपत्ती केलीये जप्त
ईडीने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महादेव महादेव ऑनलाइन बुक आणि Skyexchange.com यांच्याशी जोडलेले अवैध सट्टेबाजी नेटवर्क यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारावाईअंतरर्गत, ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्या (PMLA) अंतर्गत ९१.८२ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली. ईडीच्या या कारवाईत, दुबईतील दोन परफेक्ट प्लॅन इन्व्हेस्टमेंट एलएलसी आणि एक्झिम जनरल ट्रेडिंग या कंपन्यांच्या खात्यामधील ७४.२८ कोटी रुपयांहून अधिकची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तपासात समोर आले होते की, या कंपन्या सौरभ चंद्राकर, अनिल कुमार अग्रवाल आणि विकास छपरिया यांच्याशी संबंधित आहे. सट्टेबाजीतून कमावलेल्या पैशांची मनी लाँडरिंग करण्यासाठी या कंपन्यांचा वापर केला जात होता.






