Haseena Mastan Mirza: अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीवर लैंगिक अत्याचार...; हसीन मस्तानच्या मुलीची न्यायासाठी भावनिक हाक
हसीन मस्तान मिर्झा म्हणाली, “मला समजत नाही की आठ वेळा लग्न करून माझ्यावर बलात्कार करणारा गुन्हेगार माझ्याच बंगल्यात अजूनही आरामात कसा राहतो, माझ्याच पैशांचा उपभोग घेतो आणि माझ्या मालमत्तेतून भाडे वसूल करतो. त्याने माझे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. माझा बंगला जुहू येथील पाम स्प्रिंग्ज येथील बंगला क्रमांक १४ येथे आहे आणि त्याने हिलपार्क A2-306 येथील वीरा देसाई येथे माझा फ्लॅट देखील भाड्याने घेतला आहे.”
हसीन मस्तान म्हणाली की, मी मदतीची याचना करत आहे. जर कोणाला खरोखरच मला मदत करायची असेल, तर कृपया या गुन्हेगाराविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल करा किंवा योग्य वृत्तवाहिन्या उपलब्ध करून देण्यास मदत करा जेणेकरून मी बोलू शकेन आणि न्याय मिळवू शकेन. मला वाटते की न्यायालयाने त्याला लवकरात लवकर शिक्षा करावी, फक्त नवीन तारखा देत राहू नयेत. कृपया, मला तुमच्या पाठिंब्याची खरोखर गरज आहे. या बलात्कारीला माझे पैसे आणि मालमत्ता वापरून आरामात जगू देऊ नये. त्याने स्वतः एक पैसाही कमावला नाही. त्याच्याकडे असलेले सर्व काही माझे आहे. कृपया माझे दुःख समजून घ्या. त्याने माझी मालमत्ता, माझे पैसे आणि माझे आयुष्य हिरावून घेतले आहे. त्याने आठ वेळा लग्न केले आहे आणि र्व काही उद्ध्वस्त केले आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करते: कृपया माझ्यावर विश्वास ठेवा, कृपया मला मदत करा, कृपया मी जिवंत असेपर्यंत मला साथ द्या.
हसीनच्या वयावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देताना ती म्हणाली, “माझ्या जन्मावेळी माझे वडील ५८ वर्षांचे होते आणि आई २९ वर्षांची होती. त्यामुळे अफवा पसरवणे थांबवा. माझ्याविषयी खोट्या आणि द्वेषपूर्ण पोस्ट केल्या जात आहेत. अशा सर्व टिप्पण्यांची माहिती मी सायबर पोलिसांना दिली आहे.”
“माझी ओळख, मालमत्ता, पैसे आणि आयुष्य हिरावून घेणारा एकटाच व्यक्ती नाही, तर यात आणखी लोक सामील आहेत,” असा आरोप करत हसीनने केला आहे. तसेच, “मी जिवंत असेपर्यंत माझ्या हक्कांसाठी लढत राहीन. हाजी मस्तान मिर्झा आणि सोना मस्तान मिर्झा यांची मी एकमेव मुलगी आहे.”
महाराष्ट्राची लेक ठरली देशाचा अभिमान; IMA मधून पहिल्यांदाच महिला ऑफिसर कॅडेट पास, कोल्हापूरच्या सई
माझे वयाच्या १२ व्या वर्षी लग्न लावण्यात आले. या लग्नात माझ्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले गेले. मला तीन मुलेही झाली. पुढे पतीने पुन्हा आपल्याच मुलीशी लग्न करण्याचा प्रयत्न केला. त्याला मी विरोध केल्यानंतर मला घराबाहेर काढण्यात आले, असा आरोपही तिने केला. वयाच्या २६ व्या वर्षी तिने सर्वस्व गमावल्याची भावनाही हसीनने केली आहे.
“मी या लढ्यात एकटी आहे,” असे सांगत हसीनने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.
हसीन ही दिवंगत हाजी मस्तान मिर्झा आणि अभिनेत्री सोना मस्तान मिर्झा (खरे नाव शाहजहान बेगम) यांची मुलगी असल्याचा दावा केला जातो. सोना यांनी १९७१ मधील ‘बदनाम फरिश्ते’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. दरम्यान, हसीनने केलेले सर्व आरोप हे तिचे वैयक्तिक दावे असून, संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट किंवा चौकशीअंती असल्याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.






