दिल्लीतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. लेफ्टनंट असल्याचे सांगत एका डॉक्टर तरुणीला लग्नाचं आमिष देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीची खरी ओळख समोर आली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याची चौकशी पोलीस करत आहे. आरोपीचा नाव आरव मलिक असून तो २७ वर्षाचा आहे.
सोशल मीडियावरून ओळख आणि…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरव हा दक्षिण दिल्लीतील छतरपूर भागात राहतो. तो एका ई-कॉमर्स कंपनीत डिलिव्हरी एजंट म्हणून काम करतो. त्याची आणि महिला डॉक्टरची ओळख सोशल मीडियावर झाली होती. संवादाच्या दरम्यान आरोपीने स्वतःला भारतीय लष्करातील अधिकारी असल्याचं सांगितलं आणि सतत संपर्क ठेवला. त्याने दिल्ली कॅन्ट भागातील एका दुकानातून आर्मीची वर्दी खरेदी केली होती. त्याने ती युनिफॉर्म घालून फोटो काढले आणि फोटोंद्वारे
पीडितेला फसवलं. पीडित महिला डॉक्टर दिल्लीतील एका मोठ्या सरकारी रुग्णालयात कार्यरत आहे.
नशायुक्त पदार्थ खाऊ घातले आणि…
30 एप्रिल ते 27 सप्टेंबर दरम्यान आरोपीने डॉक्टरशी इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर सतत संवाद साधला. स्वतःला सीमारेषेवर तैनात अधिकारी असल्याचं सांगितलं. त्याने तिचा विश्वास संपादन केला आणि भावनिकरीत्या जवळीक वाढवली. आरोपी अनेकदा डॉक्टरच्या घरीही गेला. एका वेळी त्याने तिला नशायुक्त पदार्थ खाऊ घातले आणि जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. हे प्रकरण काही दिवस सुरूच राहिले. डॉक्टरने विरोध केला, तर आरोपी तिला धमकावत आणि ब्लॅकमेल करत होता. अखेर 16 ऑक्टोबर रोजी डॉक्टरच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(1) (बलात्कार), 351 (गुन्हेगारी धमकी), 319 (फसवणूक) आणि 123 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीला अटक
पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपी आरव मलिकला अटक केली. चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल आणि डिजिटल चॅट्स फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी ऑनलाईन ओळख करताना सावधगिरी बाळगा असा इशारा दिला आहे.
१२ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापला, गळा चिरला नंतर…
उत्तरप्रदेश येथील झाँसी जिल्ह्यातून अत्यंत क्रूरपणे अल्पवयीन मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी प्रायव्हेट पार्ट कापला, नंतर गळा चिरला आणि भुसाखाली लपवून ठेवला. बबीना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुरा गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. साहिल यादव असं मृत मुलाचं नाव आहे.
पुण्यात दहशतवादविरोधी पथकाची मोठी कारवाई; संशयित दहशतवाद्याला बेड्या






