उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश येथील हरदोई जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका नवविवाहित तरुणाने लग्नाच्या अवघ्या २५ दिवसानंतरच आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नीसोबत होणारे सततचे वाद आणि तिसऱ्यांदा तिने घर सोडून गेल्यामुळे निराश होऊन तरुणाने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव सुधीर वर्मा असे आहे.
पुण्यात भरदिवसा चोरट्यांचा सुळसुळाट; वृद्धाला एकटे गाठले अन्…
बिहारच्या मुलीशी केले होते लग्न
मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर वर्मा हा शेतीचे काम करत होता. त्याचे २५ दिवसांपूर्वी बिहारच्या आशा नावाच्या तरुणीशी लग्न झाले होते. मात्र लग्नच्या काही दिवसातच सुधीर आणि आशा यांच्यात सातत्याने वाद-विवाद होत होते असे कुटुंबीयांनी सांगितले. या वादामुळे आशा यापूर्वीही दोन वेळा कोणालाही न सांगता घर सोडून गेली होती. सुधीर प्रत्येक वेळी समजावून सांगून तिला परत घेऊन येत असे.
पुन्हा एकदा आशा ही रविवारी कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेली. पत्नी तिसऱ्यांदा निघून गेल्यामुळे सुधीर रात्रभर तिचा शोध घेत राहिला, पण ती कुठेही सापडली नाही. या सततच्या त्रासाला आणि पत्नीच्या तिसऱ्यांदा निघून जाण्याने आलेल्या निराशेला कंटाळून सुधीरने रात्रीच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्याला पत्नीच्या साडीचा फंदा बनवून गावाबाहेरील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
कारवाई सुरु
सोमवारी सकाळी गावकरी जात असतांना त्यांना सुधीरचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसला. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच कछौना पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
१२ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापला, गळा चिरला नंतर…
उत्तरप्रदेश येथील झाँसी जिल्ह्यातून अत्यंत क्रूरपणे अल्पवयीन मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी प्रायव्हेट पार्ट कापला, नंतर गळा चिरला आणि भुसाखाली लपवून ठेवला. बबीना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुरा गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. साहिल यादव असं मृत मुलाचं नाव आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, साहिल रविवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी साहिलची शोधाशोध सुरु केली होती. सोमवारी, कुटुंबातील सदस्य शेतातील एका खोलीत शुद्ध घेत असताना, त्यांना भुसा ठेवलेल्या खोलीचा दरवाजा बाहे रून बंद दिसला. त्यांनी दरवाजा उघडल्यावर आतमध्ये साहिलचा मृतदेह भुसाखाली रक्ताच्या थारोळ्यात आढळला.
Thane News: धक्कादायक! मैत्रिणीशी भांडण झालं, रागाच्या भरात १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीला जाळलं






