यवतमाळच्या पुसदमध्ये उधारीचे पैसे मागणाऱ्याला जबर मारहाण; चुलत्यालाही सोडलं नाही (File Photo : Crime)
बार्शीटाकळी : घरासमोर कचरा भरलेले टोपले ठेवण्यावरून दोन गटांत वाद होऊन मारहाण झाली. यामध्ये एक जण जखमी झाला असून, बार्शीटाकळी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींवरून 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. नजीमोदीन शेख निजामोदीन, (रा. इंदिरानगर) यांनी बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हेदेखील वाचा : युट्यूबवर व्हिडीओ बघून चोरी करायला शिकला; पोलिसांनी सापळा रचला आणि…., बदलापुरातील धक्कादायक घटना
नगर पंचायतचे कचरावाहू वाहन सोमवारी (दि. 16) आले होते. ते कचरा घेऊन निघून गेले. मात्र, त्यांच्या घराजवळ संकूलातील लोकांनी कचरा भरलेले टोपले तसेच ठेवले होते. शेजारी राहणारे शेख मेहमूद शेख कलंदर यांनी घराजवळ कचरा का ठेवला ? अशी विचारणा करीत त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली. त्याची आई, बहीण व भावाने शेख मेहमूदला शिवीगाळ करू नका, असे सांगितले. दरम्यान, शेख मेहमूद याची दोन मुले शेख मोईन व शेख मोहसीन यांनी त्यांच्यावर व त्यांचा भाऊ शेख काझीमोद्दीन यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले.
नाझीमोदीन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शेख मेहमूद, शेख मोईन, शेख मोहसीन आणि शेख तन्नू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच रूबिना परवीन शेख मेहमूद यांनी पोलिसांत फिर्याद दिली. आरोपीने त्यांना शिवीगाळ केली व पती शेख महेमूद, मुलगा शेख मोहसीन व शेख मोईन यांच्यासह मारहाण केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शेख अलीम शेख निजाम, शेख नजीम, शेख काजीम, शेख निजाम, शेख समीर शेख फरीद आदीवर गुन्हा दाखल आहे.
पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी
दुसरीकडे, जुन्नर तालुक्यातील आपटाळे येथील पत्रकार संदीप उत्तर्डे यांना मागील तीन वर्षांपूर्वी दिलेल्या बातमीचा आकस मनात धरून त्यांना फोनवर शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी येथील स्वयंघोषित समाजसेवक अक्षय मोहन बोऱ्हाडे याच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, या घटनेच्या निषेधार्थ तालुक्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी व पत्रकारांच्या वतीने काळ्या फिती लावून जुन्नर शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला.
शस्त्राचा धाक दाखवून दरोडा
कुटुंब गाढ झोपेत असताना काही मुखवटाधारी दरोडेखोर घरात घुसले. शस्त्राचा धाक दाखवून पती-पत्नी आणि मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली आणि जवळपास 14 लाख रुपयांचा माल लुटून फरार झाले. ही खळबळजनक घटना नागपूरच्या कपिलनगर पोलिस ठाण्यांतर्गत खसाळा-मसाळाच्या माँ जगदंबानगर परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी राजेश छेदीलाल पांडे (वय 60) यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंदविला आहे.