धुळे जिल्ह्यतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. जेवणासाठी बनवलेले मासे कुत्र्याने खाल्ल्याच्या रागातून मुलाने आईला संपवलं. मुलाने थेट आईच्या डोक्यात लाकडी दांडका मारल्याने आईचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. टिपाबाई रेबला पावरा असं मृत्यू झालेल्या आईचा नाव आहे. तर आवलेस रेबला पावरा असे आरोपी मुलाचं नाव आहे.
नाशकात खळबळ! मर्सिडीज कारसाठी पत्नीचा छळ; माहेरच्यांकडून २५ लाखांची मागणी
नेमकं काय घडलं?
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाठोडे गावातील देवेंद्र बिलेसिंग राजपूत यांच्या ताजपुरी शिवारातील शेतात काम करणाऱ्या टिपाबाई रेबला पावरा या महिलेने जेवणासाठी मासे बनवले होते. जेवणासाठी बनवलेले मासे कुत्र्याने खाल्ल्याच्या रागातून टिपाबाई रेबला पावरा यांचा मुलगा आवलेस रेबला पावरा याने आईच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये टिपाबाई पावरा यांचा मृत्यू झाला आहगे. यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपी आवलेस पावरा याला ताब्यात घेतले आहे.
नाशकात खळबळ! मर्सिडीज कारसाठी पत्नीचा छळ; माहेरच्यांकडून २५ लाखांची मागणी
वैष्णवी हगवणे नंतर नाशिक मध्ये भक्ती गुजराथी ने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. आता पुन्हा एक अशीच घटना समोर आली आहे.मर्सिडीज कारची मागणी करत माहेरून 25 लाख रुपये आणण्यासाठी एका महिलेचा मानसिक छळ झाल्याचा उजेडात आला आहे. पीडित महिलेचा नाव स्नेहल घुले असं आहे. स्नेहल ही डॉक्टर आहे. तिचा विवाह एका आयटी इंजिनिअर सोबत झालं होता. या प्रकरणी महिलेचा पती, सासू- सासरे आणि दीर- ननंद यांच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेनं सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
पुण्यातील विहिरीत आढळला एकाचा मृतदेह; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड