Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Crime: बारामती हादरलं! जुन्या भांडणातून पाच जणांवर कोयत्याने वार, पूजा सुरु असतांनाच…

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील वंजारवाडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या कारणातून पाच जणांवर कोयत्याने वार करण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 23, 2025 | 02:28 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

बारामती: पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील वंजारवाडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या कारणातून पाच जणांवर कोयत्याने वार करण्यात आले. या हल्लयात ५ जण जखमी झाले आहे. ही घटना घटस्थापनेच्या दिवशी रात्री साडे आठच्या सुमारास वंजारवाडी येथील दत्त मंदिर समोर घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे.

Ahilyanagar Crime: रक्षकच निघाला भक्षक! पोलीस निरीक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याचे आरोप

नेमकं काय घडलं ?

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी २२ सप्टेंबर रोजी फिर्यादी अमोल आण्णा चौधर, भारत गोकुळ चौधर, सागर चंद्रकांत चौधर, आदित्य सर्जेराव चौधर, सुनिल गोरख चौधर हे सर्व व इतर नवरात्र उत्सव चालू असल्याने देवीची ज्योत राशीन येथून मौजे वंजारवाडी येथे दत्त मंदिरासमोर घेऊन आले. मंदिरासमोर पुजा पाठ करून पारंपारिक वाद्यावर उत्सव साजरा करीत होते. त्याचवेळी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी त्या ठिकाणी आली.

त्या चारचाकी येथून ऋतिक उर्फ गुड्या मुळिक, ओम कुचेकर, अली मुजावर ,दिपक भोलनकर आणि शुभम वाघ व त्यांचेसोबत असणारे दोन ते तीन अनोळखी इसम होते. त्यांच्या हातात लोखंडे कोयते आणि चाकू अशा पद्धतीची हत्यारे होती. आणि त्यानंतर या व्यक्तींनी दत्त मंदिरासमोर उभा असणाऱ्या फिर्यादी यासह त्यांच्या बंधुंवर हल्ला चढवला यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले.

गुन्हा दाखल

पोलिसांनी या घटनेनंतर ऋतिक उर्फ गुड्या मुळिक, ओम अर्जुन कुचेकर,अली मुजावर, दिपक भोलनकर आणि शुभम वाघ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .या घटनेनंतर शुभम वाघ,अली मुजावर आणि ओम अर्जुन कुचेकर या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर या हल्ल्यामध्ये सुनिल चौधर,अमोल चौधर, भारत चौधर, सागर चौधर आणि आदित्य चौधर हे पाच जण जखमी झाले आहेत

बाप-लेकाने 24 वर्षीय पुतण्याला बेदम मारहाण करत संपवलं

 बारामतीमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. माझ्या जागेत बाथरूम का बांधले म्हणून विचारायला जाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. बाप लेकाने आपल्या पुतण्याला बेदम मारहाण केली. यात पुतण्याचा जीव गेला. या प्रकरणी तालुका पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे पुतण्याला मारहाण केल्यानंतर हे दोघे बाप- लेक तालुका पोलीस ठाण्यात येऊन सौरभ विरोधात फिर्याद दिली. ही घटना बारामती तालुक्यातील पारवडी येथील इंगळे वस्तीवर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. या घटनेमध्ये सौरभ विष्णू इंगळे या २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या बाप लेकाला अटक केली आहे.

बिजलीनगर झोपडपट्टीत तरुणाची हत्या; उजवा हात धारदार हत्याराने तोडला अन्…

Web Title: Five people were attacked with a sickle over an old dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 02:28 PM

Topics:  

  • baramati
  • Baramati Crime
  • crime

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime: रक्षकच निघाला भक्षक! पोलीस निरीक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याचे आरोप
1

Ahilyanagar Crime: रक्षकच निघाला भक्षक! पोलीस निरीक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याचे आरोप

Yavatmal Crime: गर्भपाताच्या गोळीने 17 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिकवणी शिक्षकाला अटक, डॉक्टरचीही चौकशी सुरू
2

Yavatmal Crime: गर्भपाताच्या गोळीने 17 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिकवणी शिक्षकाला अटक, डॉक्टरचीही चौकशी सुरू

भाजपचा माजी नगरसेवकच सूत्रधार ! नाशिकच्या सागर जाधव गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती
3

भाजपचा माजी नगरसेवकच सूत्रधार ! नाशिकच्या सागर जाधव गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती

Crime news: ओळख लपवून लग्न, वर्षभर सामूहिक बलात्कार, विवाहित महिलेला ठेवले बंदिस्त; थरारक घटना ऐकून पोलिसही हादरले
4

Crime news: ओळख लपवून लग्न, वर्षभर सामूहिक बलात्कार, विवाहित महिलेला ठेवले बंदिस्त; थरारक घटना ऐकून पोलिसही हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.