अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी एका 30 वर्षीय तरुणीने बलात्कार, दमदाटी, आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. या संदर्भात पीडितेने तक्रार दिली असून तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी तो मनोर पोलीस स्टेशन, पालघर (जि. ठाणे) येथे वर्ग करण्यात आला आहे.
महिलेने काय केले आरोप
तक्रारदार महिलेने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत, आरोपी प्रताप पांडुरंग दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. हे संबंध पालघर येथील फार्महाउस, तसेच जोगेश्वरी वेस्ट, मुंबई येथे ठेवण्यात आले, असा आरोप आहे.
तुला जे करायचं ते कर…
पीडितेने जेव्हा लग्नासाठी आग्रह धरला, तेव्हा आरोपीने तिला “जे काही आपल्यात घडलं, ते विसरून जा” असे म्हणून शिवीगाळ केली आणि पोलीस तक्रार करण्याचा प्रयत्न करताच “तुला जे करायचं ते कर” अशी दमदाटी दिली, तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली गेली असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.
चौकशी सुरु
या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असून, आरोपीवर कायदेशीर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.या प्रकरणाचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यातून मनोर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकारामुळे संपूर्ण अहिल्यानगर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर इतका गंभीर आरोप झाल्यामुळे पोलीस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बापाने चार मुलांना विहिरीत ढकलले, नंतर स्वतःही आत्महत्या केली
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात एक हादरवणारी घटना समोर आली आहे. राहाता तालुक्यात शिर्डीपासून साधारण १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या केलवड-को-हाळे शिवारात विहिरीत पाच मृतदेह आढळले आहेत. या प्रकरणात वडिलांनी चार मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्या केल्याचा संशय आहे. या भयंकर घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आरोपीचं नाव अरुण सुनील काळे (वय 35) असं नाव आहे. अरुण त्याच्या पत्नीला कायम मारहाण करत होता. त्यामुळे पत्नी घर सोडून वेगळी राहत होती. ही मुलं श्रीगोंदातील मेहकरमधील ही सर्व मुलं आहेत. ती अहिल्यानगर तालुक्यातील वीरभद्र प्राथमिक शाळेत शिकत होती. पत्नी नांदायला येत नसल्याने संतापलेल्या पत्नीला नांदायला ये अन्यथा मुलांना मारून टाकेन अशी धमकी दिली होती. काळेंनी मुलांची कटिंग करून आणतो असे सांगून शाळेत गेला होता. त्यानंतर तो मुलांना शाळेतून घेऊन गेला आणि पसार झाला. त्यानंतर त्यांचे मृतदेह विहिरीमध्ये आढळले.