गुगल मॅप्सच्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या एका टीमला गावकऱ्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरांच्या संशयावरून गावकऱ्यांनी हा हल्ला केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा गैरसमज दूर झाला. ही घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील बिरहर गावात घडली आहे.
Ulhasnagar News: धक्कदायक! उल्हासनगरच्या बाल सुधारगृहातून ६ मुली गेल्या पळून, २ मुली सापडल्या
नेमक काय आहे प्रकरण?
‘टेक महिंद्रा’ या कंपनीकडून गुगल मॅप्ससाठी सर्वे करत असलेली एक टीम गुरुवारी रात्री गावात पोहोचली होती. त्यांच्या गाडीवर कॅमेरे आणि इतर उपकरणे लावलेली होती. ज्याचा वापर ते रस्त्यांची आणि परिसराची छायाचित्रे घेण्यासाठी करत होते. गुगल मॅपवर अचूक माहिती देण्यासाठी ते हे काम करत होते. यावेळी गावातील काही लोकांना त्यांच्या कॅमेरा- सज्ज वाहनावर संशय आला. त्यांना वाटले की हे लोक चोरी करण्यासाठी माहिती गोळा करत आहे. यानंतर गावकरांच्या एका घटनेने या गाडीला वेडा घातला आणि टीमच्या सदस्यांना अडवले. परिस्थिती हाताबाहेर गेली आणि गावकऱ्यांनी टीमला मारहाण करायला सुरुवात केली. काही मिनिटांचं हा प्रकार वाढत गेला.
पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या गावकऱ्यांनी आणि गुगल मॅप्सच्या टीमला पोलीस ठाण्यात आणले. तिथे टीमने गावकऱ्यांच्या संशयाला उत्तर दिले आणि आपण चोर नसून, मॅपिंगचे काम करत असल्याचे सांगितले. या सर्वेक्षणासाठी पोलीस महासंचालकांकडून परवानगी घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.गावकऱ्यांचा राग शांत झाला आणि त्यांना सत्य समजले.
कानपुर पोलिसांना सांगितले की, स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चौकशी केली. त्यांना खात्री पटली की ही टीम गुगल मॅपिंगचे काम करत आहे. सध्या घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात असून, स्थानिक लोकांना शांत करून घरी पाठवण्यात आले आहे. या भागात अनेक चोऱ्या झाल्या होत्या, त्यामुळे गावातील लोक अधिक सतर्क होते. याच कारणामुळे हा गैरसमज झाला. पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर, गुगल मॅपच्या टीमने गावकऱ्यांविरोधात कोणताही गुन्हा दाखल केला नाही.
सांगोला तालुक्यात पोलिसांची सगळ्यात मोठी कारवाई, 2.65 कोटींचा जुगार अड्डा उद्ध्वस्त
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या 2.65 कोटी रुपयांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत तब्बल 30 ते 35 जुगारींना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पोलिसांनी 16 लाख रुपयांची रोकड, 87 वाहने आणि 62 मोबाईल जप्त केले आहेत. ही कारवाई सांगोला तालुक्यातील मोठी कारवाई आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
जमीन लीजवर देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला 85 लाखांचा गंडा; कागदपत्रे दाखवली अन् नंतर…