उल्हासनगर मधून एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. बालसुधार गृहातून ६ अल्पवयीन मुली पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सहा पैकी दोन मुलींचा शोध पोलिसांनी घेतला आहे. तर चार मुलींचा शोध पोलीस घेत आहेत. सापडलेल्या मुलींनी पोलिसांसोबत जबाब दिला आहे की, आम्हाला त्या ठिकाणी राहायचे नाही. त्यामुळे आम्ही पळून गेलो.या मुली पळून गेल्याने बालसुधारगृहाच्या सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
२७ ऑगस्टला बुधवारी दुपारी दोन ते तीन वाजताच्या सुमारास उल्हासनगर येथील शासकीय बालसुधार गृहात सहा अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्या. त्यानंतर माहिती समोर आली की या मुलींनी मेन गेटची चावी कुठून तरी मिळवली. मेन गेट उघडून सहा मुली तिथून पळून गेल्या. या प्रकरणात उल्हासनगर हिल्लईं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहा मुली अचानक बेपत्ता झाल्याने पोलिसांनी याचा तपास सुरु केला.
उल्हासनगरचे डीसीपी सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलींना शोधण्यासाठी पथके नेमली गेली. दोन मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले. या दोन मुली त्यांच्या मिराभाईंदर येथील राहत्या घरी मिळून आल्या. याबाबत उल्हासनगरचे डीपीसी गोरे यांनी सांगितले की, या सहा पैकी काही मुली मिराभाईंदर, काही मुली ठाणे तर काही मुली मुंबईतील आहेत. घटनेच्या दिवशी या सहा पैकी काही मुली मेन गेटची चावी असलेल्या रुममध्ये गेल्या. तिथून त्यांनी चावी मिळवली.
यावेळी या ठिकाणी नेमण्यात आलेले सुरक्षा रक्षक हे जेवण करण्यासाठी गेले होते. याच संधीचा फायदा या मुलींनी घेतला. चावी हाती लागल्यानंतर त्या मेन गेट उघडून पळून गेल्या. ज्या दोन मुली पोलिसांना सापडल्या त्यांनी सांगितले की, त्यांना या सुधारगृहात राहायचे नाही. अजून चार मुलींचा शोध सुरु आहे. त्यांनाही लवकरच शोधून काढण्यात येईल असं सांगितलं. मात्र सुधारगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे.
जमीन लीजवर देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला 85 लाखांचा गंडा
संस्थेची जमीन लीजवर देण्याच्या बहाण्याने दोन ठकबाजांनी एका व्यावसायिकाला 85 लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी सदर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये प्रशांत अशोक सतरालकर (वय ५५, रा. कॅथेड्रल कम्पाऊंड, सदर) आणि गौतम ओमप्रकाश सिंग (वय ३५, रा. प्रशांतनगर, गिट्टीखदान अशी आरोपींची नावे आहेत
फिर्यादी मनप्रितसिंग दलवीरसिंग बुधराजा यांचे सदरच्या राजभवन गेटजवळ ‘पहनावा’ बुटिक आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना मोठी जागा पाहिजे होती. ऑगस्ट २०२४ मध्ये मोती जैन नावाच्या प्रॉपर्टी डीलरने मनप्रितशी संपर्क केला. सीताबर्डी कॉफी हाऊससमोर प्रशांत सतलारकर याची २८७२ वर्ग फुटाची जमीन असून, त्याला ती जमीन लीजवर द्यायची आहे, अशी माहिती मिळाली.
Solapur Crime: सांगोला तालुक्यात पोलिसांची सगळ्यात मोठी कारवाई, 2.65 कोटींचा जुगार अड्डा उद्ध्वस्त