राज्यात गुटखाबंदी उरली केवळ कागदावरच; खुलेआम होतेय गुटखा विक्री (संग्रहित फोटो)
तासगाव : तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर ग्रामीण रुग्णालयाच्या समोर असणाऱ्या रस्त्यावर गुटखा व सुंगधी तंबाखूची वाहतूक करत असताना एकाला पकडले. ओंकार शशिकांत एडके (वय २४ रा, कुंडल ता. पलूस ) असे सशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून मोटरसायकल, सुगंधी तंबाखू, गुटखा व पान मसाला असा एक लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस शिपाई सुहास दिलीप खुबीकर यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, संशयित ओंकार हा गुटखा व सुगंधी तंबाखूची तस्करी करत असल्याची माहिती पोलीस सुहास खुबीकर यांना मिळाली होती. त्यादृष्टीने खुबीकर हे तासगाव मणेराजुरी रस्त्यावर गस्त घालत असताना संशयित ओंकार हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल (एमएच ०९ बीआर ६०४८) वरून आल्याचे दिसून आले. खुबीकर यांनी ओंकार याची मोटरसायकल त्याकडे असणाऱ्या पिशवीची झडती घेतली. तेव्हा अ महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रतिबंधित केलेल्या पान मसाला, सुगंधित तंबाखू, गुटखा व केशरयुक्त सुगंधी सुपारी असा एक लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित माल आढळून आला.
संशयित ओंकार हा विक्री करण्याच्या उद्देशाने प्रतिबंधित माल साठा व वाहतूक करण्याच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व गुटखा, सुगंधित सुपारी, पान मसाला असा एक लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.