पत्नीची निर्घृण हत्या! डोके कापून फ्रीजमध्ये ठेवले अन् त्यानंतर शिजवून खाल्ले जेवण; लग्नानंतर काही महिन्यांतच पती बनला हैवान
पूर्ववैमनस्यातून सराईत गुंडाची हत्या; दारू पाजून धारदार शस्त्रांनी तब्बल 24 वार केले अन्…
काही महिन्यांआधीच झाले होते लग्न…
मिळालेल्या माहितीनुसार, रामानुज आणि रियाचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. हे जोडपे गुवाहाटीच्या हातीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. स्थानिकांनी अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. स्थानिकांनी सांगितले की, मागील दोन दिवसांपासून दोघेही नवरा-बायको दिसून आले नाही आणि त्याच्या फ्लॅटमधून फार दुर्गंध वास येत आहे.
फ्लॅट उघडतास सत्य आलं समोर
जेव्हा पोलिसांनी अपार्टमेंटमध्ये दाखल होऊन फ्लॅटचा दरवाजा तोडला तेव्हा त्यांना आत महिलेचे कापलेले शरीर आढळले. महिलेचे ओळख २५ वर्षीय रिया तालुकदार अशी पटली आहे. आरोपीने तिची बोटे कापली होती आणि तिच्या शरीराची विघटन प्रक्रिया सुरु झाली होती. घराची तपासणी केल्यानंतर महिलेचे शिर फ्रिजमध्ये पाॅलिथीन बॅगच्या आत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह आणि कापलेले शिर ताब्यात घेतले असून त्यांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. यादरम्यान फरार असलेल्या पतीने पोलिसांसमोर येऊन सरेंडर केले असून त्याला आता अटक करण्यात आले आहे. पोलिस सध्या आरोपीची चाैकशी करुन हत्येचे कारण आणि घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त
मृतदेहाचे तुकडे कुत्र्यांना घालण्याची योजना
हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पती अमली पदार्थांच्या आहारी गेला असावा अशी शक्यता आहे. पोलीस विवाहबाह्य संबंध आणि पूर्वी झालेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या शक्यतेचाही तपास करत आहेत. पोलिसांनी असेही सांगितले की, आरोपी पतीचा मृतदेहाचे तुकडे करुन त्यांना कुत्र्यांना खाऊ घालण्याचा प्लॅन होता. पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने घरात जेवण शिजवून खाल्ले आणि तो फरार झाला.






