मुलुंडमध्ये हिट अँड रन! BMW कारने गणेश मंडळातील दोन जणांना उडवले, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
सध्या महाराष्ट्रभरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु आहे परंतु मुंबईतल्या मुलुंड मध्ये ‘मुलुंडचा राजा’ या मंडळावर शोककळा पसरली आहे. पुण्यात आणि वरळीत हिट अँड रन प्रकरणे ताजी असतानाच आता मुलुंड पूर्व येथे हिट अँड रनची केस पाहायला मिळाली आहे. या हिट अँड रन प्रकरणात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.
मुलुंडमध्ये पहाटे दोन तरुण आपल्या सार्वजनिक मंडळाचे बॅनर लावण्यास घराबाहेर पडले. सकाळी रस्त्यांवर रहदारी असल्यामुळे त्यानी पहाटे तीन वाजताची वेळ निवडली. जेणेकरून, ते सुरळीतपणे आपल्या गणेश मंडळाचा बॅनर लावू शकतील. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. दोन्ही तरुण बॅनर लावण्यासाठी आले असताना त्यांना भर वेगात असणाऱ्या बीएमडब्ल्यू कारने जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुणाला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची स्थिती अत्यंत नाजूक असल्याचे सांगितले जात आहे.
हे देखील वाचा: पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; केंद्र सरकारने उचचलं मोठ पाऊल
दोन तरुणांना आपल्या बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्यानंतर कार चालक पसार झाला होता. या घटनेत प्रीतम थोरात नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर प्रसाद पाटील या तरुणाची स्तिथी अत्यंत गंभीर आहे. ही बीएमडब्ल्यू कार मुलुंड पूर्वेकडून पश्चिमेकडे जात होती. यावेळी या कारने दोन तरुणानं धडक दिली. दोन्ही तरुणांना उडवल्यानंतर कार चालक मदतीसाठी न थांबता थेट पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कार आणि फरार झालेल्या आरोपीचा शोध घेतला.
हे देखील वाचा: आमदार महेश लांडगेंना जीवे मारण्याची धमकी; तरुणाला अटक
या घटनेतील आरोपीला बेड्या ठोकण्यात आले आहे. शक्ती हरविंदर अलग असे या आरोपीचे नाव असून तो मुलुंडचाच रहिवासी आहे. शक्तीने आपली बीएमडब्ल्यू कार दुरुस्त केली होती. या कारची टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी त्याने आपली कार बाहेर काढली आणि अपघात झाला. या घटनेनंतर त्याने कार आपल्या घराजवळ पार्क केली आणि नवी मुंबा गाठली. मात्र पोलिसांनी त्याला खारघर येथे बेड्या ठोकल्या आहे.