सोलापूर- हैद्राबाद महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. या घटनेत भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ॲसिडने भरलेल्या टँकरला जबर धडक दिली. या अपघातात एका वाहनचालकाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा भीषण अपघात मुळेगाव तांडा परिसरात बुधवारी सकाळी घडला.
भरधाव कंटेनरने दुभाजक ओलांडून थेट समोरून येणाऱ्या टँकरला धडक दिली. कंटेनरने धडक दिलेल्या टँकरमध्ये नायट्रिक ॲसिड भरलेले होते आणि ॲसिड अपघातानंतर बाहेर निघाले. यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास अडचणी येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनाथली दाखल झाले आहेत. या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
या दुर्घटनेत एका वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा भीषण अपघात सोलापूर – हैद्राबाद महामार्गावर मुळगाव तांडा परिसरात बुधवारी सकाळी घडला आहे.
धक्कादायक ! अल्पवयीन मुलाची गळा चिरून हत्या; शेतातच फेकून दिला मृतदेह
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच जळगावच्या एरंडोल तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. यामध्ये 13 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह शेतात फेकून देण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
तेजस गजानन महाजन (वय १३) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तेजसने सोमवारी सायंकाळी बाजारात फिरताना एका दुकानातून बिर्याणी घेतली होती. मात्र, त्यानंतर सायंकाळी सात वाजल्यापासून तो कुणालाच दिसला नाही. बेपत्ता झाल्यानंतर गावात शोधमोहीम सुरू झाली. जवळपास पहाटे तीन वाजेपर्यंत गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला. परंतु, त्याचा काहीही पत्ता लागला नाही. अखेर, एका व्यक्तीला तेजसचा मृतदेह आढळून आला. त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तेजस महाजन हा आपल्या कुटुंबासह रिंगणगाव येथे राहत होता. तो 16 जूनपासून बेपत्ता झाला होता. मुलगा सापडत नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध सुरू केला. मात्र, कुठेही काही माहिती मिळाली नाही. नंतर त्याचा मृतदेहच मिळून आला. त्यामुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
जिचा अंत्यसंस्कार केला ती परतली जिवंत, मग मृतदेहातील ‘ती’ कोण?