मुंबई-हावडा मेल टायमर बॉम्बने उडवण्याची धमकी; अधिकारी सतर्क (फोटो सौजन्य-X)
रेल्वेसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत असतू आली आहे. मुंबई हावडा मेलमध्ये उडवून देण्याची धमकी मिळाली होती. ज्यामध्ये टायमर बॉम्ब ठेवला जाईल असे सांगण्यात आले होते. हा संदेश पहाटे 4 वाजता ऑफ- कंट्रोल मिळाला असून 12809 क्रमाकांची गाडी तातडीने जळगाव स्थानकात थांबवून सुरक्षा रक्षकांकडून ट्रेनची तपासणी करण्यात आली.
बॉम्बस्फोटाची धमकी धमकीनंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आणि संपूर्ण ट्रेनमध्ये शोधमोहीम राबवली. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्फोटाची धमकी देण्यात आली होती. सोशल मीडिया पोस्टमध्ये नाशिकमध्ये टायमरद्वारे स्फोटाची धमकी देण्यात आली होती. ‘एक्स’ पोस्टमध्ये महाराष्ट्र पोलिसांसाठीही अपशब्द वापरले आहेत.
बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर सोमवारी (14 ऑक्टोबर) पहाटे 4 वाजता मुंबई हावडा मेल जळगावात थांबवून झडती घेण्यात आली. सुमारे दोन तासांच्या सखोल चौकशीनंतरही सुरक्षा कर्मचाऱ्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यानंतर बॉम्ब सापडण्याची धमकी निव्वळ अफवा असल्याचे सांगण्यात आले.
ट्रेन बॉम्बने उडवण्याची धमकी फझलुद्दीन नावाच्या अकाउंटवरून देण्यात आली होती. त्यात लिहिले होते, ‘हिंदुस्तानी खून के आंसू रोओगे…, आज फ्लाइटमध्ये आणि ट्रेन 12809 मध्ये बॉम्ब ठेवले आहेत. नाशिकला पोहोचण्यापूर्वी मोठा स्फोट होईल.’
मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानालाही धोका
याआधी मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानालाही बॉम्बची धमकी मिळाली होती. यानंतर विमान दिल्लीच्या दिशेने वळवण्यात आले. सध्या शोध सुरू आहे. त्यानंतर विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा विमानाची कसून चौकशी करत आहेत.
दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे एअर इंडियाचे विमान बॉम्बचा धोका लक्षात घेऊन दिल्लीकडे वळवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विमान सध्या IGI विमानतळावर ग्राउंड केले आहे आणि विमानातील प्रवासी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्व मानक सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमानाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रात्री 2 वाजता उड्डाण केले. विमान न्यूयॉर्कला जात होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला बॉम्बची धमकी मिळाली, त्यानंतर ते दिल्लीकडे वळवण्यात आले.