राज्यात पावसाचा जोर वाढणार (फोटो- istockphoto)
राज्यात पावसाचा जोर वाढणार
पुढील 4 ते 5 दिवस अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज
अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी
गेले काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरशः कहर केला आहे. हवामान विभागाने पुढील काहिवास पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके वाहून गेली आहेत. दरम्यान हवामान विभागाने काय इशारा दिला आहे ते जाणून घेऊयात.
आजपासून पुढील चार ते पाच दिवस राज्यभरात सर्वत्र पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाडा भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांसाह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काढणी करण्यात आलेली पिके सुरक्षित ठेवावीत असे आवाहन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात, पुणे आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. सप्टेंबर महिना उलटून गेला तरी पाऊस थांबण्याची चिन्हे नसल्याचे आता चिंता व्यक्त केली जात आहे. पाऊस जर असाच सुरू राहिला तर ऐन दिवाळीत देखील वरुणराजा हजेरी लावतो की काय? ते पहावे लागणार आहे.
राज्यात अतिवृष्टी झाली आहे मराठवाड्यात बळिराजाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मदतीची घोषणा केली आहे. पंचनामे केले जात आहेत. सरकारचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने चिंता वाढली आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ऑक्टोबर महिन्यात देखील हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे यंदा दिवाळी देखील पावसामध्येच साजरी करावी लागणार का हे अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ऑक्टोबर महिन्यात देखील राज्यसह देशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, रायगड, पालघर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्याला जोरदार पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Rain Alert: यंदा आणा वॉटरप्रूफ पणत्या! कारण पाऊस ऑक्टोबरमध्ये …; चिंता वाढली
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाळा पोषक हवामान तयार झाले आहे. हवामानात हॉट असणाऱ्या बदलांमुळे सप्टेंबर महिना संपला तरी देखील पावसाळा संपलेला नाही. ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा देखील चिंतेत सापडला आहे.