आजकाल क्षुल्लक क्षुल्लक कारणावरुन पतीपत्नीमधे भांडण (Quarrel between husband and wife) होऊन नात्यामध्ये कटुता येण्याचं प्रमाण वाढलं आहे. कधी कधी या भांडणाचं पर्यवसन मारहणीत होतं तर कधी कधी रागाच्या भरात दोघांपैकी कुणीतरी असं काही करतं ज्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. भांडणामुळे संतापाच्या भरात मागचा पुढचा विचार न करता जीवही देतात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. पतीला दारू पिण्यास मनाई करणे एका महिलेला चांगलच महागात पडलं आहे. दारु पिण्यावरुन झालेल्या भांडणात संतापलेल्या पतीने गळफास (Husband Suicide) लावून जीव दिला.
[read_also content=”तामिळनाडूत ट्रेनमध्ये बेकायदेशीरपणे घेऊन जात होते सिलिंडर, आग लागल्याने 9 जणांचा मृत्यू, 20 जखमी! https://www.navarashtra.com/india/8-passenger-died-in-fire-at-running-train-in-tamilnadu-nrps-449786.html”]
उत्तरप्रदेशच्या बांदा येथे दारू पिण्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा महिलेने तिच्या पतीला दारू पिण्यास थांबवले तेव्हा दोघांमध्ये भांडण सुरू झाले. हे भांडण इतकं विकोपाल गेलं की पतीने रागाच्या भरात घरात गळफास घेत स्वत:च आयुष्य संपवलं. घटनेच्या दिवशीही तिने पतीला रात्री उशिरा दारू पिण्यास मनाई केली होती, त्यानंतर तरुणाने आत्महत्या केली. मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.
कोतवाली शहरातील शुकुल कुआँ परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला दारूचे व्यसन होते. तो मोलमजुरी करून कुटुंबाचं पोट भरत होता. नातेवाईकांनी सांगितले की, व्यक्ती दारू पिऊन घरात गोंधळ घालत असे. पत्नी दारू पिण्यावरुन नेहमी टोकत होती. यावरुन त्याच्यांत सतत वाद होत होता. तो रोज दारु पिऊन घरी येत होत असं नातेवाइकांनी सांगितले. मात्र, हा तरुण अचानक एवढं मोठं पाऊल उचलेल याची कल्पनाही नव्हती. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत डीएसपी शहर गवेंद्र पाल गौतम यांनी सांगितले की, कोतवाली शहरातील शुकुल कुआं येथे पती-पत्नीच्या वादातून एका व्यक्तीने आत्महत्या केली, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.